ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर ;पाहा तुमच्या मतदारसंघात उमेदवार कोण?
Thackeray group candidates announced; see who is the candidate in your constituency?
लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. विद्यमान खासदार अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत यांच्यासह एकूण १७ जणांची नावे जाहीर केली आहेत.
ठाकरे गटाचे 17 उमेदवार
१) बुलढाणा -प्रा. नरेंद्र खेडेकर
२)यवतमाळ – वाशिम-संजय देशमुख
३)मावळ- संजोग वाघेरे पाटील
४)सांगली-चंद्रहार पाटील
५)हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
६)संभाजीनगर-चंद्रकांत खैरे
७)धारशीव-ओमराजे निंबाळकर
८)शिर्डी-भाऊसाहेब वाघचौरे
९)नाशिक-राजाभाऊ वाजे
१०)रायगड-अनंत गीते
११)सिंधुदुर्ग – रत्नागिरी-विनायक राऊत
१२)ठाणे-राजन विचारे
१३)मुंबई – ईशान्य-संजय दिना पाटील
१४)मुंबई – दक्षिण-अरविंद सावंत
१५)मुंबई – वायव्य-अमोल कीर्तिकर
१६)परभणी-संजय जाधव
१७) दक्षिण मध्य- अनिल देसाई
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष राज्यातील नगर दक्षिण, बीड, बारामती, माढा, शिरूर, सातारा, वर्धा, रावेर, भिवंडीसह दहा जागा लढवण्याची तयारी करीत आहे.
यात पक्षाकडून पहिली उमेदवारांची यादी उद्या (ता. २८) जाहीर करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
या यादीकडे नगर दक्षिण आणि बीड लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला जाणार आहे, म्हणून विशेष लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे या शरदचंद्र पवार पक्षाकडून बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार यांची साथ करणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या यादीची उत्सुकता शिगेला आहे.
तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक आयोजित केली जात आहे. या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
दरम्यान, महाविकास आघाडीत समावेशासाठी वंचितच्या अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या. परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर संतापले आहेत.
त्यामुळे आंबेडकर आज पत्रकार परिषद घेऊन अंतिन निर्णय जाहीर करणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे स्वबळावर लढण्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024