नवनीत राणा अडचणीत बच्चू कडूंकडून उमेदवाराची घोषणा
Navneet Rana announces candidate from Bachu Kadu in trouble
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट देण्यात आलं होतं. नवनीत राणांविरोधात कोण उभं राहणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
आज बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून नवनीत राणांविरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.
आजचा दिवस भावनिक आहे.आयुष्यातील मोठा निर्णय आज घेत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेत आहे. सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर केलं आहे.
आमच्या चार पिढ्या या सामाजिक कार्यात आहे. हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. पण एक वर्षांपूर्वी अरविंद सावंत यांनी सांगितलं की इथे शिकसेनेचे काम नाही आणि हा मतदारसंघ काँग्रेसला गेला.
अनेक लोकांना प्रश्न पडले मतदान कोणाला करावे. अनेक लोकांनी मला फोन केले की निवडणुकीत उभे राहा. मला भाजप, काँग्रेस,
राष्ट्रवादी, प्रहार, शिवसेनेच्या नेत्यांनी फोन केले आणि निवडणुकीत उभे राहायला सांगितलं असल्याचं दिनेश बूब यांनी म्हटलं आहे.
मला जर निवडणुकीत निवडून दिल तर चुकीच्या लोकांना निवडून दिल याचा पश्चाताप होणार नाही मला निवडून दिल्यास मतदारांना अभिमान वाटेल जिल्ह्याच्या हितिहासासाठी मी निवडणुकीत उभा आहे.
मी शिवसेनेचा राजीनामा दिला नाही शिवसेनेला मी मनातून काढू शकत नाही शिवसेना माझ्या रक्ता रक्तात आहे. शिवसेनेने
जर पक्षातून काढलं तर तो त्यांचा अधिकार आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा पक्षाचा अधिकार आहे, असं दिनेश बूब म्हणाले.