‘या’ भागात दोन दिवस पावसाची शक्यता

Chance of rain for two days in 'this' area

 

 

 

 

 

शुक्रवारी दुपार पुन्हा एकदा मुंबईकरांसाठी असह्य उकाड्याची ठरली. अधूनमधून ढगाळलेले आभाळ, आर्द्रतेची वाढलेली जाणीव यामुळे मुंबईकर हैराण झाले होते.

 

 

 

शनिवारीही मुंबईसह कोकण आणि गोव्यात मुंबईप्रमाणेच उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात

 

 

 

 

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचाही अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

 

 

शुक्रवारी मुंबईत सांताक्रूझ येथे ३२.५ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. आर्द्रतेमुळे शुक्रवारीही किमान तापमानाचा पारा चढा होता.

 

 

 

सांताक्रूझ येथे २५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईत अधून मधून जाणवलेल्या ढगाळ वातावरणामुळे उकाड्याचा ताप अधिक जाणवला.

 

 

 

 

मात्र शुक्रवारचा मुंबईचा उष्णता निर्देशांक ४० अंशांहून कमी होता, असे भारतीय हवामान विभागाच्या नकाशावर नोंदले गेले.

 

 

 

 

शनिवारीही आभाळ अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे, तसेच कमाल तापमानाचा पारा अधिक चढू शकतो असाही अंदाज आहे. त्यानंतर रविवारपासून आभाळ पुन्हा निरभ्र होईल.

 

 

 

महाराष्ट्रात शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. शनिवाराही जळगाव, नाशिक, हिंगोली, लातूर, धाराशीव, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे

 

 

 

तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस, मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी सोलापूर, नांदेड, अमरावती, बुलडाणा, वर्धा येथे रात्रीचे तापमान अधिक जाणवेल असाही अंदाज आहे.

 

 

 

 

अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ येथे उष्णतेची लाटही जाणवू शकते, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *