आनंदाची बातमी ;यंदा पावसाळ्यात पडणार भरपूर पाऊस
Good news; this year there will be a lot of rain in the monsoon season

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. स्कायमेटच्या खासगी हवामान संस्थेच्या अहवालानुसार, यावर्षी सामान्य मान्सून अपेक्षित आहे.
यावर्षी जून आणि सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान भारतात सामान्य मान्सून राहण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अहवालानुसार, यावर्षी जून
आणि सप्टेंबरच्या दरम्यान भारतामध्ये सामान्य मान्सून राहण्याची शक्यता आहे. देशात ८६८.६ मिलीमीटर पाऊस पडणार अशून या पावसाची टक्केवारी १०२ टक्के असणार आहे.
‘मान्सून फोरकास्ट 2024’ या शीर्षकाच्या अहवालानुसार भारताच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात अनुकूल पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश
सारख्या मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर बिहार, झारखंड, ओडिसा, आणि पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडेल,
अशी शक्यता आहे. स्कायमेटनुसार केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोव्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. देशाच्या मध्य भागात सामान्य पाऊस होणार आहे.
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांच्या मतानुसार, अल निनो जलद गतीने ला नीनामध्ये बदलत आहे. ला नीना वर्षांमध्ये मान्सूनमध्ये मजबूतपणे रुपांतरीत होत आहे.
सुपर एल निनोचे मजबूत ला निनामध्ये संक्रमण झाल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या चांगला मान्सून तयार झालाय. एल निनोच्या अवशिष्ट परिणामांमुळे नुकसान होण्याच्या जोखमीसह पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊ शकतो.
देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय तापमान गरम होत आहे. तसा आता तापमानाचा पाराही हळूहळू वर चढत आहे. हवामान विभागाने काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
त्याचबरोबर जवळपास ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते असा, इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय.