ठाकरे पिता-पुत्र तुरुंगात जातील भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Thackeray father and son will go to jail BJP leader's statement stirs excitement

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बंधूने माघार घेतली आहे.

 

 

 

मात्र, अजूनही या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. असं असूनही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात प्रचाराला सुरुवात केली आहे.

 

 

 

 

आज त्यांनी पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अब की बार 400 पारचा नाराही दिला. तसेच ठाकरे पितापुत्र तुरुंगात जाणार असल्याचा दावाही केला. नारायण राणे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

भाजपने सिंधुदुर्गात एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला संबोधित करताना नारायण राणे यांनी हा दावा केला आहे.

 

 

 

राज्यात किंवा देशात कुणीही विचारलं तर भाजपचे कार्यकर्ते निष्ठावंत, प्रामाणिक आहेत, मात्र त्यांना विनंती आहे की, हा विश्वास सार्थकी लागला पाहिजे. भांडू नका, नांदा सौख्य भरे, असं मार्गदर्शन नारायण राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं.

 

 

 

गेल्या अडीच वर्षातील माझ्या कामाचं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी कौतुक केलं. पण विनायक राऊत यांना त्याचं कौतुक नाही. ठाकरे गटाचे टवाळके संसदेत बसून राणे उत्तर देऊ शकले नाहीत,

 

 

 

अशी बोंबाबोंब करत. गेल्या 35 वर्षापासून मी राजकारणात अविरत आहे. भात शेती सुरू झाली की जशी माकडं येतात, तसे विरोधक निवडणुकीच्या तोंडावर येतात. विनायक राऊत यांचे रोग सांगण्यासारखे नाहीत, अशी टीका राणे यांनी केली.

 

 

 

 

 

1990 नंतर विरोधकांनी सिंधुदुर्गात कोणती विकासकामे केली ती दाखवा. चिपी विमानतळाला विरोध करायला विनायक राऊत पुढे होते. आता उद्घाटनालाही पुढे होते. उद्धव ठाकरे इथे येऊन बोलतात,

 

 

 

त्यांचं सगळं बाहेर काढणार, असा इशाराच त्यांनी दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या हातवाऱ्यावरही त्यांनी टीका केली. अजून पैसा घेऊन या असे हातवारे उद्धव ठाकरे करायचे, असा दावा त्यांनी केला.

 

 

 

यावेळी त्यांनी वैभव नाईक यांचा घमेलं म्हणून उल्लेख केला. मी जिल्ह्यात आलोय. आता टीका करून दाखव. मी त्या सभेत व्यासपीठावर येतो. दाखवा टीका करून, असा इशाराच राणे यांनी दिला.

 

 

 

कोरोना काळात झालेल्या घोटाळ्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पिता पुत्र जेलमध्ये जाणार आहेत. ईडी, सीबीआयसारखी माझी वेगळी यंत्रणा असून त्याच्या माध्यमातून सगळी माहिती माझ्याकडे येते, असा दावा त्यांनी केला.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *