आज मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी

Yellow alert issued today for unseasonal rain with lightning in Marathwada

 

 

 

 

राज्यासह देशाच्या हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. राज्याच्या काही भागात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढत आहे.

 

 

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित राज्यामध्ये उकाडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहेत.

 

 

 

राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत सोलापूर, बीड, लातूर,

 

 

 

 

 

उस्मानाबाद या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

 

 

 

 

 

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

हवामान विभागाने 16 एप्रिल आणि 17 एप्रिलला उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत मात्र हवामान कोरडं राहणार असून काही भागात तापमान वाढीची शक्यता आहे.

 

 

राज्यात आज, सोमवारपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा चढण्याचा अंदाज आहे.

 

 

 

मुंबईत सोमवारपासून तापमानाचा पारा पुन्हा चढता राहणार आहे. मराठवाड्यात रविवारपासून चार दिवसांच्या कालावधीत ३ ते ५ अंशांनी कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते. किमान तापमानही सोमवारनंतर वाढू शकते. तसेच उष्णता निर्देशांकही ४० ते ५० अंशांदरम्यान असू शकेल.

 

 

 

प्रादेशिक हवामान विभागाने रविवारी पुढील पाच दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केला. कोकण विभागात सोमवार ते बुधवार या कालावधीत कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढू शकतो.

 

 

 

या कालावधीत उष्णता निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकेल, असेही प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले. मध्य महाराष्ट्रात रविवारपासून चार दिवसांच्या कालावधीमध्ये २ ते ४ अंशांनी कमाल तापमान वाढण्याचा अंदाज आहे.

 

 

 

 

रविवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ४० ते ५० अंशांदरम्यान उष्णता निर्देशांक नोंदला गेला. १८ एप्रिलपर्यंत अशाच प्रकारे तुरळक ठिकाणी उष्णता निर्देशांक अधिक नोंदला जाण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

कोकण विभागात उष्णता आणि आर्द्रता सोमवार ते बुधवार या काळात अधिक जाणवल्याने चटका अधिक जाणवू शकेल. आर्द्रता आणि उष्णता यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा तापमानाची जाणीव अधिक होईल.

 

 

 

 

त्यामुळे मुंबईकरांना तसेच कोकण किनारपट्टीवर अधिक अस्वस्थता जाणवू शकेल. कोकण किनारपट्टीवर रविवारी उष्णता निर्देशांक ४० अंशांपेक्षा कमी होता.

 

 

 

 

मात्र, सोमवारपासून याची तीव्रता वाढून तो ४० ते ५० अंशांदरम्यान असू शकेल. या कालावधीमध्ये दीर्घ काळ उन्हात राहू नये,

 

 

 

असे प्रादेशिक हवामान विभागाने सुचवले आहे. तसेच पाणी पिणे, सुती कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी, छत्री किंवा अन्य कपडा घेणेही अपेक्षित आहे.

 

 

 

 

 

रविवारी मुंबईतील कुलाबा येथे ३२ आणि सांताक्रूझ येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे रविवारीही थोडा दिलासा मिळाला. मात्र, या आठवड्यात तापमान अधिक जाणवू शकेल, असा अंदाज आहे.

 

सामान्य सल्ला:

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 12 ते 18 एप्रिल दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची व 19 ते 25 एप्रिल दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किचिंत कमी झालेला आहे.

 

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 17 ते 23 एप्रिल 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

संदेश :

तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

 

 

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

 

 

 

 

 

मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर

 

 

 

 

जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू व करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा. काढणी/मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

 

 

 

 

 

 

 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी.

 

 

 

 

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

 

 

 

 

 

पशुधन व्यवस्थापन

वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच दिनांक 12 एप्रिल रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयात गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

 

 

 

 

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

 

 

 

 

कृषि अभियांत्रिकी

रब्बी पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *