प्रकाश आंबेडकरांना MIM ने दिला पाठिंबा

MIM supported Prakash Ambedkar

 

 

 

 

गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर ‘एमआयएम’चा महाराष्ट्रातील एकमेव खासदार छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आला, त्याच संभाजीनगरात काल एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी यांनी एक आश्चर्यकारक भूमिका जाहीर केली.

 

 

 

वंचित आघाडीशी युती तुटल्यानंतर एमआयएम स्वबळावर महाराष्ट्रात पहिलीच लोकसभा निवडणूक लढवत आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना बडेभाई मानणाऱ्या ओवेसी यांनी मनात कुठलीही अढी न ठेवता अकोला लोकसभा मतदारसंघात त्यांना पाठिंबा जाहीर केला.

 

 

 

याआधीच ‘एमआयएम’ने अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

 

 

 

 

एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी गेल्या महिन्यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची भेट झाली होती. या वेळी दोघांनी सोबत भोजन घेत राजकीय विषयावर चर्चा केली.

 

 

 

 

त्यानंतरच अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर यांना एमआयएमने पाठिंबा देण्याचे निश्चित केले होते. याची अधिकृत घोषणा ओवेसी यांनी काल कन्नडच्या जाहीर सभेत केली.

 

 

 

संभाजीनगरात झालेल्या सभेमध्ये इम्तियाज जलील यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याप्रमाणेच प्रकाश आंबेडकर यांनादेखील

 

 

 

अकोला लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी केली. त्याला ओवेसी यांनी आपल्या भाषणातून तत्काळ मान्यता देत प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला.

 

 

 

. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे दलित समाजाची एक गठ्ठा मते इम्तियाज जलील यांना मिळाली होती.

 

 

 

या वेळी प्रकाश आंबेडकरांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेत मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात उमेदवार

 

 

 

दिले आहेत. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांना बसण्याची शक्यता आहे.

 

 

ओवेसी हैदराबाद सोडून तीन दिवस संभाजीनगर येथे ठाण मांडून होते. यादरम्यान त्यांनी मुस्लिम धर्मगुरू, दलित, वंचित समाजाच्या घटकांशी चर्चा करत भेटीगाठी घेतल्या.

 

 

 

कुठल्याही परिस्थितीत इम्तियाज जलील पुन्हा निवडून आले पाहिजे यासाठी ‘एमआयएम’ने विशेष रणनीती आखली आहे.

 

 

 

अमरावतीत आनंदराज आंबेडकर व अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय हा याच रणनीतीचा एक भाग समजला जात आहे.

 

 

 

प्रकाश आंबेडकर यांना मानणारा संभाजीनगरात मोठा वर्ग आहे. तसेच त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनाही दलित समाजामध्ये मानाचे स्थान आहे.

 

 

 

 

या दोघांनाही पाठिंबा जाहीर करत त्यांना मानणाऱ्या समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे. आनंदराज आंबेडकर यांना एमआयएमने पूर्वीच पाठिंबा जाहीर केला होता. फक्त त्याची अधिकृत घोषणा ओवेसी यांनी केली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *