पवार काका -पुतण्याच्या लढाईत आता दाऊदची इंट्री

Now Dawood's entry in Pawar's uncle-nephew battle

 

 

 

 

 

काही काही जण सांगतात की, आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. अहो पण भ्रष्टाचाराचा आरोप केव्हा होईल, तुम्ही मंत्री झाला तर होईल ना… खासदार, आमदारावर कशाला भ्रष्टाचाराचा आरोप होईल?

 

 

 

 

भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झाले आहेत काय? ‘भूखंडाचे श्रीखंड खाल्ले’ हा आरोप कोणावर आहे? गँगस्टर दाऊद इब्राहिमशी कुणाचे नाव जोडले गेले? हे कुणावर आरोप झाले?

 

 

 

असे सवाल विचारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रचंड हल्लाबोल केला. तुमच्यावर झालेल्या आरोपांत सत्यता नव्हती

 

 

 

पण आरोप तर झाले ना… बदनामी तर झाली ना.. असे सांगत आपल्यावरही झालेल्या आरोपांत सत्यता नाही, असेच अजित पवार यांनी सुचविले.

 

 

 

बारामती लोकसभेच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत

 

 

 

 

बुधवारी बारामतीत वकील आणि डॉक्टरांचा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

 

 

 

अजित पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षात आत्ताच्या खासदारांनी (सुप्रिया सुळे) बारामतीत नजरेत भरणारे कोणतेही एक विकासाचे काम केले असेल तर ते मला दाखवा…. मी ज्या ज्या इमारती उभ्या केल्या आहेत,

 

 

 

 

त्या सगळ्या त्यांच्या परिचय पत्रकामध्ये छापल्या आहेत. मी तर म्हटलं, ही सगळी कामे मीच केली आहेत. मी रात्रंदिवस राबलो. चार चार-पाच पाच आर्किटेकला घेऊन बसलो.

 

 

 

 

बारामतीकरांना अभिमान वाटेल, अशा इमारती मी उभ्या केल्या, पण त्याचे श्रेय दुसऱ्यानेच घेतले, अशा शब्दात अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली.

 

 

 

 

मी कधीही भेदभाव केला नाही. ४०-४० वर्ष एकदाच्या घरात सून येऊनही तिला परके कधी मानले नाही. ती शेवटी घरचीच झाली ना… परंतु काही जण परकी मानतात. महिलांनी याच्याबद्दल बारकाईने विचार करायला पाहिजे.

 

 

 

कारण तुम्हीही कुठे ना कुठे सून म्हणून आला आहात. तुम्ही सून म्हणून आल्यानंतर मालकीन झालात आणि तुम्हाला जर घरातील वरिष्ठ परकी म्हटले

 

 

 

 

तर तळपायाची आग मस्तकापर्यंत जाणार नाही का..? असे म्हणत अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

 

 

दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद आता लेक आणि सूनेवरुन पुढे द्रौपदीपर्यंत पोहोचला आहे. शरद पवारांनी बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बाहेरच्या पवार असल्याचं वक्तव्य केलं होतं.

 

 

 

त्यानंतर आता अजितदादांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. खरंतर अजित पवार हे मुलींच्या जन्मदराच्या गंभीर प्रश्नाबाबत बोलत होते. मात्र, याबाबत बोलताना त्यांनी थेट द्रौपदीचं उदाहरण दिलं. चूक लक्षात येताच दादांनी हात जोडले आणि मी विनोद केला गांभीर्याने घेऊ नका असं सांगितलं.

 

 

 

 

मात्र, आता या वक्तव्यावरुन शरद पवार गटाने दादांनी घेरलं आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली. अजित पवारांच्या डोक्यात जे विष होतं ते बाहेर आलं आहे, असं ते म्हणाले.

 

 

 

 

इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “आपण पाहिलं की काही जिल्ह्यांमध्ये मुला आणि मुलींच्या जन्मदरात मोठी तफावत दिसून येते.

 

 

 

१००० मुलांमागे ८००-८५० मुली जन्माला येतात. हा दर आता आणखी कमी होऊन ७९० वर पोहोचला आहे. त्यामुळे पुढे आणखी कठीण होईल.

 

 

 

मी म्हटलं की पुढे द्रौपदीचा विचार करावा लागतो की काय?, असा प्रसंत त्यावेळी येईल”. आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यानंतर अजित पवारांनी लगेच हात जोडले

 

 

 

आणि मी विनोद केला याला गांभीर्याने घेऊ नका. नाहीतर ते म्हणतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. मी कोणाचा अपमान करु इच्छित नाही, असंही सांगितलं. पण, त्यांच्या या वक्तव्यावरुन आला नवा वाद उफाळून आला आहे.

 

 

 

जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर टीका करत म्हटलं की, महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न करणारे काकांनी (शरद पवार) महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

शिवाज महाराजांनी कर्मकांडाचा विरोध केला. महात्मा फुले यांनी महिलांच्या शिक्षणाचे मार्ग खुले केले. द्रौपदीचा अर्थ काय आहे? अजित पवारांच्या डोक्यातील विष बाहेर आलं आहे. अजित पवारांनी सर्व महिलांची माफी मागावी.

 

 

 

 

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन उमेदवार एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

 

 

येथून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात अजित दादा गटाच्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे ननंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *