23 ते 25 एप्रिल;वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा हवामान अंदाज

23rd to 25th April; Vasantrao Naik Marathwada Agricultural University Weather Forecast

 

 

 

 

राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात वादळी वारा, मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास करून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात हा पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण जरी असले तरी

 

 

 

मोठ्या प्रमाणात तापमान देखील वाढले आहे. मुंबईत आणि ठाण्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. मुंबईत 33 °C, तर ठाण्यात 36°C तापमानाची नोंद झाली आहे.

 

 

कोणत्या जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट?

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

 

 

 

चंद्रपूर, गडचिरोली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोलीमध्ये देखील वाऱ्यासह ढगाळ वातावरण राहील.

 

 

 

वेधशाळेने जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या स्वरूपात गारा पडण्याचा इशारा दिला आहे.

 

 

 

त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, मारेगाव, वणी, कळंब, राळेगाव तालुक्यात ढग दाटून येऊन पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

 

 

 

 

यामुळे प्रचंड उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वणी तालुक्यातील आकापुर शेत शिवारात बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैल जागीच मृत्यू झाला.

 

 

 

मारेगाव आणि कळंब तालुक्यातील काही भागांमध्ये हलक्या गारासह पाऊस पडला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस दिवसाकरिता ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त केल्या गेला आहे.

 

 

 

गेल्या चार दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापुरात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

 

 

उत्तर सोलापूर तालुक्यात झालेल्या वादळ वाऱ्यामुळे मार्डी गावात काढणीला आलेला आंबा उध्वस्त झाला आहे. हाताला आलेली अनेक पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

 

 

 

 

मार्डीतील बाळासाहेब पाटील या शेतकऱ्याचे तब्बल 550 आंब्याची झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

दिनांक 23 एप्रिल रोजी धाराशिव व लातूर जिल्हयात, दिनांक 24 एप्रिल रोजी जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव व लातूर जिल्हयात,

 

 

दिनांक 25 एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

दिनांक 23 एप्रिल रोजी धाराशिव व लातूर जिल्हयात, दिनांक 24 एप्रिल रोजी जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव व लातूर जिल्हयात, दिनांक 25 एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा,

 

 

 

मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात चोवीस तासात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

 

सामान्य सल्ला:

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 26 एप्रिल ते 02 मे दरम्यान पाऊस सरासरी एवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 28 एप्रिल ते 04 मे 2024 दरम्यान पाऊस सरासरी एवढा, कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

संदेश :

नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

 

 

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा.

 

 

 

 

सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

 

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

 

 

 

 

नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

 

 

 

नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

 

 

 

 

नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल.

 

 

 

 

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

 

 

 

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करता येते.

 

 

 

 

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची, कांदा, टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी लवकरात लवकर करावी.

 

 

 

कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे.

 

 

 

पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

 

 

 

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.

 

 

 

 

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

 

 

पशुधन व्यवस्थापन

उन्हाळयात होणाऱ्या उष्माघाताचा ताण टाळण्यासाठी जनावरांच्या शरीरावर दर अर्ध्या तासाने पाच मिनिटाकरीता पाणी फवारण्यात यावे.

 

 

 

 

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी.

 

 

 

 

पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

 

 

 

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

 

 

 

कृषि अभियांत्रिकी

रब्बी पिकांच कापणी झाल्यानंतर शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.

 

 

 

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *