फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केले;मोदींनी सांगितले कारण

Why did Shinde become Chief Minister after Fadnavis; Modi said the reason

 

 

 

 

 

देवेंद्र फडणवीसांना डावलून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का करण्यात आलं? क्षमता असूनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर का बसवण्यात आलं? पहिल्या क्रमांकाचा पक्ष असूनही भाजपने हा त्याग का केला?

 

 

 

 

गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होतोय. अनेक तर्क-वितर्क यासाठी लावले जातायत. पण ठोस उत्तर ना कधी फडणवीसांकडून मिळालं, ना भाजप पक्षश्रेष्ठी यावर बोलले.

 

 

 

 

त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत हातात मिळालं. अगदी इथपर्यंत बोललं गेलं, की फडणवीसांचे पंख छाटण्याचा हा प्रयत्न आहे. पण आता खुद्द नरेंद्र मोदी यावर बोलले आहे.

 

 

 

 

हे पाऊल उचलण्यामागे भाजपची रणनीती काय होती? या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या महामुलाखतीत दिलंय.

 

 

 

 

शिवसेना फुटली. महाविकास आघाडीचं सरकार पडलं. एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह भाजपसोबत येत नवीन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली.

 

 

 

व्यासपीठावर एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस असतील असंच सगळ्यांना वाटत होतं, पण घोषणा झाली तेव्हा एकच खळबळ उडाली.

 

 

 

 

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाली अन् उपमुख्यमंत्री पदाची धुरा फडणवीसांनी सांभाळली. हे अनपेक्षित होतं. एकतर हे सर्व घडवून आणल्यामुळे फडणवीस महाबली म्हणून पुढे आलेले.

 

 

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा अनुभवही होता. शिवाय आकडेवारीनुसार गेलं तरी भाजप मोठा भाऊ होता. नियमानुसार मुख्यमंत्रीपदावर भाजपचा हक्क होता. पण तरी माळ पडली ती शिंदेंच्या गळ्यात. म्हणून ‘हे का झालं?’ या प्रश्नाला तोंड फुटलं.

 

 

 

ठाकरेंसोबत 2019 ची विधानसभा लढवल्यानंतर अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्मुला ठरला होता. पण तसं झालं नाही, भाजपने मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिल्याने

 

 

 

 

ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत जात महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याचं सांगितलं गेलं. आपल्या हातातून मुख्यमंत्री पद गेल्यामुळेच

 

 

 

 

 

त्याचा वचपा काढण्यासाठी पुढील अडीच वर्षात भाजपने खेळी केली, असं बोललं जात होतं. पण आता नरेंद्र मोदींनीच यावर मौन सोडलं आहे.

 

 

 

“भाजपच्या जास्त जागा असूनही महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्याग केला. आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून असं केलं असं काहींना वाटत होतं, पण असं नाही.

 

 

 

 

आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आमच्यासाठी जगत नाही, हे आम्ही महाराष्ट्राला सांगितलं. त्यामुळे सहानुभूती आमच्याबाजूने आहे. इतका मोठा पक्ष,

 

 

 

एक यशस्वी मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री बनून, एक प्रकारे स्वत: चा सन्मान सोडून आज भाजप फक्त महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी ही भूमिका घेत आहे”

 

 

 

एकंदरित महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला असून फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही स्वत:ला यशस्वी सिद्ध केल्याचं मोदी म्हणालेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *