वादळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
Thunderstorm likely, forecast by Meteorological Department

शहरात आल्हाददायक थंडीची जाणीव होऊ लागली. मात्र अद्याप म्हणावा तसा नोव्हेंबरचा ‘फिल’ नाही. सध्या बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नागपूर व विदर्भाला आठवड्याअखेरीस पावसाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत आहेत.
ऑक्टोबरच्या अखेरीपासूनच वातावरण कोरडे होऊ लागले. त्यामुळे दिवसा चांगले ऊन पडू लागले आहे. रात्रीसुद्धा मोकळे आकाश असल्याने वातावरणात गारवा जाणवतो आहे.
विशेषत: रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळेस आल्हाद जाणवतो. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी जोर धरू लागते. मात्र, यंदा मिधिलीमुळे उत्तरेकडील थंड वारे मध्य भारतापर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होत असून
थंडीने जोर पकडलेला नाही. हे चक्रीवादळ जमिनीवर येऊन त्याचा प्रभाव कमी झाल्यावरच थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
स्वागतामुळे कधी रात्री तर कधी भल्या पहाटेच सभा, पुण्यातील सभेतला सूत्रसंचालकही म्हणाला, तुम्ही सगळे नशीबवान!
दरम्यान, सोमवारी नागपुरात ३१.७ इतक्या कमाल तर १८ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली.
कमाल तापमान हे सरासरीपेक्षा ०.८ अंशाने तर किमान तापमान हे सरासरीपेक्षा २ अंशांनी अधिक होते. नागपुरातील नोव्हेंबरमधील सरासरी किमान तापमान हे १६ अंशांच्या आसपास असते.
पुढील चार दिवस किमान तापमान १७ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. परंतु, आठवड्या अखेरीस अर्थात २५ व २६ नोव्हेंबरला
वातावरणात बदल होईल. २५ रोजी ढगाळ वातावरणाची शक्यता असून २६ रोजी तर वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.