महाराष्ट्रात पाच वाजेपर्यंत 53.40 टक्केमतदान तर बारामती सर्वात कमी मतदान
53.40 percent polling till 5 pm in Maharashtra while Baramati has the lowest polling
राज्यातील सर्वाधिक लक्ष्यवेधी असणाऱ्या 11 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 53.40 टक्के मतदान झाल्यांच समोर आलं आहे.
त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूरमध्ये 63.71 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 62.18 टक्के मतदान झालं. सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये झालं असून 45.68 टक्के मतदान झाल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढल्याचं दिसत आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे,
लातूर – 55.38 टक्के
सांगली – 52.56 टक्के
बारामती – 45.68 टक्के
हातकणंगले – 62.18 टक्के
कोल्हापूर – 63.71 टक्के
माढा – 50.00 टक्के
उस्मानाबाद – 52.78 टक्के
रायगड – 50.31 टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 53.75 टक्के
सातारा – 54.11 टक्के
सोलापूर – 49.11 टक्के
राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 45.68 टक्के मतदान झालं. इतर मतदारसंघांच्या तुलेनेत हे मतदान कमी असल्याचं दिसतंय.
बारामतीमध्ये यावेळी सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असून शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राज्यातील तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघात निवडणूक होत असून त्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये झाल्याचं दिसतंय.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये 63.71 तर शेजारच्या हातकणंगलेमध्ये 62.18 टक्के मतदान झालं आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी लढत होत आहे.
राज्यातील प्रमुख लढती
रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील अशी लढत होत आहे.
साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज अशी लढत आहे.
सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत आहे.
माढ्यात भाजपचे रणजित नाईक-निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत आहे.
बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा नणंद-भावजय सामना आहे.
हातकणंगलेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजीत पाटील विरूद्ध शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे.
राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आधी अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी दिलेल्या धमकीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर
आता शरद पवार गटाकडून आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यात भिगवणमधील बूथ 5 मध्ये अजित पवारांच्या सदस्याकडून मतदारांना इशारा आणि दमदाटी सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पोलिसांच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतरही या गोष्टी सुरू असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये अजित पवार गटाकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला.
या संबंधित राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटलंय की,
‘विरोधकांकडून उपस्थित असणाऱ्या सनी भिमराव तापकीर नावाच्या व्यक्तीकडून मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना इशाऱ्याद्वारे दबाव आणून दमदाटी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून नेमण्यात आलेला बूथ सदस्य प्रेम मनोज भोसले यांनी विरोधकांच्या या नियमबाह्य कृत्याची बाब वारंवार उपस्थित निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
परंतु उपस्थित यंत्रणांकडून कारवाईची कुठलीही ठोस पावलं उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून मतदानाच्या ठिकाणी उपस्थित
असणाऱ्या सनी भिमराव तापकीर याच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडून तातडीने कारवाई करण्यात यावी.’
या आधीही बारामतीमध्ये पैसे वाटण्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार रोहित पवारांनी त्याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. अजित पवारांच्या कारखान्यात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा नातलग पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अजितदादा घ्या….. #ED आणि #CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ…
आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका.. आणि इतर लोकं… pic.twitter.com/7zMNBxUGth
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024