अदानी-अंबानी वरून मोदी-राहुल गांधी मध्ये घमासान ;पाहा VIDEO

From Adani-Ambani to Modi-Rahul Gandhi ; see VIDEO

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या आधी निवडणूक प्रचारात अदानी आणि अंबानींची एन्ट्री झालीय. यावेळी गौतम अदानी आणि अंबानींचा विषय काँग्रेस नेते राहुल गांधींनी नाही तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढल्यानं सर्वाच्या भुवया उंचावल्यात.

 

 

 

तेलंगणातल्या प्रचारसभेत मोदींनी अदानी, अंबानींवरून थेट राहुल गांधी आणि काँग्रेसवरच आरोपांच्या फैरी झाडल्या. ऐन निवडणुकीत राहुल गांधी हे अदानी आणि अंबानींवर गप्प का आहेत असा सवाल करत काँग्रेसने अदानी, अंबानींकडून पैसा घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला.

 

 

 

 

याआधी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार केवळ अदानी, अंबानींसाठीच काम करत असल्याचा आरोप सातत्यानं केला आहे. अदानींच्या यशाचं रहस्य काय आणि मोदींचं त्यांच्याशी नेमकं नातं काय

 

 

 

असा थेट सवाल राहुल गांधींनी भर संसदेत केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अदानी आणि अंबानी यांच्यावरून राहुल गांधींना सवाल केला आहे.

 

 

 

 

पण राहुल गांधींच्या यापैकी कोणत्याच आरोपांना मोदींनी कधीच थेट उत्तर दिलं नव्हतं. राहुल गांधींच्या आरोपांनंतरही मोदींनी संसदेत अनेकदा भाषण केलं, पण त्यात अदानींचा साधा उल्लेखदेखील केला नाही.

 

 

 

 

या मुद्द्यांवर आतापर्यंत गप्प असणाऱ्या मोदींनी ऐन निवडणुकीत स्वत:च अदानी, अंबानींचं नाव घेत राहुल गांधींवरच आरोप केलाय. त्यासाठी निवडणुकीचे तीन टप्पे संपल्यानंतर चौथ्या टप्प्याचा मुहूर्त मोदींना का शोधून काढला हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

 

 

 

तेलंगणातील करीमनगर निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा उद्योगपती गौतम अदानी आणि अंबानी यांचे नाव घेत राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली होती.

 

 

 

यानंतर आता राहुल गांधी यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. ते टेम्पोमध्ये पैसे देतात, हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का?

 

 

 

अशी विचारणा राहुल गांधी यांनी करत एक काम कमी करा, त्यांना सीबीआय ईडीला पाठवा, लवकरात लवकर पूर्ण माहिती मिळवा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

 

 

 

राहुल गांधी यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, नमस्कार मोदी जी, थोड घाबरले आहात का? तुम्ही पहिल्यांदाच अदानी अंबानींबद्दल जाहीरपणे बोललात.

 

 

 

 

तुम्हाला हे देखील माहित आहे की ते टेम्पोमध्ये पैसे देतात, हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम कमी करा, त्यांच्याकडे ईडी सीबीआय पाठवा, लवकरात लवकर पूर्ण माहिती मिळवा, मोदीजी घाबरू नका.

 

 

 

 

मी देशाला पुन्हा पुन्हा सांगत आहे की नरेंद्र मोदीजींनी जेवढा पैसा त्यांना दिला आहे, तेवढाच पैसा आम्ही भारतातील गरीब लोकांसाठी देणार आहोत.

 

 

 

 

महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी निश्चित योजना, या योजनांद्वारे कोट्यवधी लखपती करणार आहोत. त्यांनी 22 अब्जाधीश केले आम्ही करोडो लखपती करणार आहोत.

 

 

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अदानी-अंबानी यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. खरगे यांनी ट्विट करून म्हटले, काळ बदलत आहे.

 

 

 

 

 

मित्र आता मित्र राहिला नाही..! निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आज पंतप्रधान आपल्याच मित्रांवर हल्लेखोर झाले आहेत, यावरून मोदींची खुर्ची डळमळीत झाल्याचे दिसून येते. हा निकालांचा खरा ट्रेंड आहे.

 

 

 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर अंबानी आणि अदानी यांची नावे घेणे का थांबवले? काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी त्या उद्योगपतींकडून किती पैसे मिळाले आहेत.

 

 

 

 

मोदी पुढे म्हणाले की, गेल्या 5 वर्षांपासून काँग्रेसचे राजपुत्र सकाळी उठल्याबरोबर जपमाळ करत होते. त्यांचे राफेल विमान ग्राउंड झाले.

 

 

 

तेव्हापासून त्यांनी नवीन जपमाळ जपण्यास सुरुवात केली. 5 वर्षे एकच जपमाळ जपायची, ‘5 उद्योगपती’, मग हळूहळू ‘अंबानी’, ‘अदानी’ म्हणू लागले.

 

 

 

पीएम मोदी म्हणाले, पण निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी आणि अदानींना शिव्या देणे बंद केलं आहे. आज मला तेलंगणाची भूमीतून विचारायचं आहे की, मला काँग्रेसच्या राजपुत्राला विचारायचे आहे की,

 

 

 

त्यांना अदानी आणि अंबानींकडून किती माल मिळाला? काळ्या पैशाने भरलेली किती पोती घेतली? अंबानी आणि अदानींना शिव्या देणं रातोरात थांबवलं असा कोणता व्यवहार झाला? नक्कीच काहीतरी गडबड आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *