विजांच्या कडकडाटासह आज पडणार पाऊस;हवामान खात्याचा अंदाज

Rain will fall today with lightning; Meteorological department forecast

 

 

 

 

राज्यात आज कोकण विभाग वगळता अनेक भागात उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबईसह कोकणात उन्हाचा जोर वाढला असताना,

 

 

 

 

राज्यात इतर ठिकाणी अवकाळी पावसामुळे वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. विदर्भ , मराठवाडा यासह

 

 

 

 

मध्य महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसाने ) हजेरी लावली आहे. अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावली आहे.

 

 

 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज 9 मे रोजी पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली,

 

 

 

 

छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

हवामान विभागाने आज नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर सातारा, कोल्हापूर,

 

 

 

 

जळगाव नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याला आज पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

 

 

याशिवाय, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे. अहमदनगर, जालना, परभणी, बीड

 

 

 

 

या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 10 मे रोजी वातावरण सामान्य राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *