निवडणुकींनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण ? फडणवीसांनी सांगितले “हे” नाव

Who will be the Chief Minister of Maharashtra after the elections? Fadnavis said this name

 

 

 

 

सध्या देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात चार टप्प्यातलं मतदान सुरु आहे. राज्यात गेल्या ५ वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता मतदारांचा कौल कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

 

 

 

 

४ जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. त्याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर राज्यातील अनेक नेत्यांचं भवितव्य ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

 

 

 

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

 

 

 

लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार? शिंदेच कायम राहणार? अजित पवारांना संधी मिळणार की राज्याचं नेतृत्त्व भाजपकडे जाणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार?

 

 

 

 

 

असे अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत. याबद्दल विचारलं असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्याच नेतृत्त्वात लढली जाईल याचा पुनरुच्चार केला.

 

 

 

 

 

विधानसभा निवडणुकीनंतर काय करायचं याचा निर्णय आमचा पक्ष करेल. वापरा आणि फेका हे आमचं धोरण नाही. आमची महायुती आहे. निवडणूक होईपर्यंत शिंदेच मुख्यमंत्री असतील. त्यानंतर पक्ष निर्णय घेईल.

 

 

 

 

कोणीही मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा ठेवणं, स्पप्न पाहणं चुकीचं नाही. अजित पवार राजकारणात भजन करायला किंवा आमची पालखी वाहायला आलेले नाहीत. त्यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची इच्छा, महत्त्वाकांक्षा असू शकतो. त्यात गैर काहीच नाही, असं फडणवीस म्हणाले.

 

 

 

 

 

इच्छा, आकांक्षा असण्यात काही चुकीचं नाही. पण राजकीय वास्तवही लक्षात घ्यायला हवं. सध्याच्या घडीला भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे.

 

 

 

 

विधानसभेनंतरही तीच परिस्थिती असेल. त्यामुळे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्यावेळी शिंदे आणि अजित पवारांशी चर्चा केली जाईल, असं फडणवीस म्हणाले.

 

 

 

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का, असा प्रश्न खासदार प्रफुल पटेल यांनाही विचारण्यात आला. त्यावर राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक उत्तर त्यांनी केलं.

 

 

 

 

 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं कोणाला वाटलं होतं का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. आमच्या पक्षाला नेतृत्त्व मिळावं किंवा आमच्या नेत्याकडे मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही का?

 

 

 

 

पण प्रत्येक गोष्ट वास्तवाचा विचार करुन करावी लागते. इच्छा प्रत्येकाची होती. शरद पवारांनाही पंतप्रधान होण्याची इच्छा होती. पण तसं घडलं नाही. संधी आली होती, पण त्यांनी ती गमावली, असं पटेल यांनी सांगितलं.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *