मान्सूनची अंदमानमध्ये हजेरी;ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार

Monsoon arrival in Andaman; winds will blow at a speed of 40 KM per hour

 

 

 

 

दोन दिवसांपूर्वी मुंबईत धुळीचे मोठे वादळ आले होते. वादळ काही वेळातच थांबले तरी या वादळाची चर्चा मात्र, अद्याप थांबलेली नाही. या वादळाचे फोटो आमइ व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

 

 

 

 

अशातच आता पुन्हा एकदा वादळ येणार आहे. ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार आहेत. हवामान खात्याने या वादळाचा इशारा दिला आहे.

 

 

 

 

 

30-40 किमी प्रतितास प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. पुढील तीन ते चार तासांत नुंदरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात हे वादळी वारे वाहणार आहेत

 

 

 

या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. घराबाहेर जाताना खबरदारी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

 

13 मे रोजी मुंबईत वादळ आले होते. या वादळामुळे मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली.

 

 

 

 

या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 67 लोक जखमी झाले आहेत. वादळासह पाऊस आल्याने 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगकाळी थांबले होते.

 

 

 

यावेळी हे होर्डिंग कोसळले.तर, दुसरीकडे वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळले. यामध्ये 12 ते 13 कारचं नुकसान झाले.

 

 

 

 

पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून यंदा 2 दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होत आहे. यंदा प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी झालाय.

 

 

 

 

दरवर्षी 21 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानमध्ये दमदार हजेरी लावतो. त्यानंतर केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी राज्यात

 

 

 

पावसाने दडी मारली होती. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नव्हता. यंदा मात्र 2 दिवस आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल होत आहे.

 

 

 

राज्यात अवकाळी पावसाचं सत्र सुरु असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश भागांना वादळी वाऱ्यांनी झोडपून काढलं. यामध्ये अनेक दुर्दैवी घटनाही घडल्याचं पाहायला मिळालं.

 

 

 

अचानक ओढावलेल्या या संकटानंतरही राज्यातील परिस्थिती काही केल्या सुधारताना दिसत नाहीय. सध्या मध्य महाराष्ट्र आणि

 

 

 

मराठवाड्यासह विदर्भात अवकाळीची हजेरी पाहायला मिळत असतानाच राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

 

 

 

उष्णतेची लाट वाढणार आहे. तर, मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तापमान वाढ नोंदवली जाणार आहे.

 

 

 

 

उष्णतेच्या लाटेसमान परिस्थिती इथं पाहायला मिळेल. तर, काही भागांमध्ये दमट वातावरण अडचणी आणखी वाढवताना दिसणार आहे.

 

 

 

 

या भागांमध्ये तापमानात सरासरीहून किमान तीन अंशांची वाढ नोंदवली जाऊ शकते. पुढील 48 तासांसाठी हीच स्थिती कायम राहणार असल्यामुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात येत आहे.

 

 

 

 

दरम्यान, विदर्भाचा काही भाग आणि कोकणातील निवडक भाग वगळता पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्यात वादळी वारे आणि पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे.

 

 

 

 

तर कुठे आकाश अंशत: ढगाळ राहील असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा

 

 

आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपातील पाऊस होणार आहे. वादळ येण्याची शक्यता असून, यादरम्यान ताशी 40-50 किमी इतक्या वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

 

 

यावेळी ताशी 50-60 किमी इतक्या वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचीही शक्यता वर्तवण्यात आलीय.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *