बच्चू कडूंचे वक्तव्य ;म्हणाले विधानसभा निवडणूकीतून माघार घेणार

Bachu Kadu's statement: He will withdraw from the assembly elections

 

 

 

 

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वच पक्षांनी विधानसेभासाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे.

 

 

 

पक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

 

 

१९ तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे. त्यांनी तर आमच्या मागण्या केल्या तर माझी निवडणूकीतून माघार असणार आहे, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.

 

विधानसभा निवडणूक सध्या तोंडावर आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदार विधासभेची जोरदार तयारी करत आहे. मात्र बच्चू कडू यांनी निवडणुक लढणार नसल्याचे वक्तव्य केले आहे.

 

त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसंच मी महायुतीत नाही, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

‘पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोजगार हमी मधून करावी, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा, दिव्यांगाना 6000 रुपये प्रति महिना द्यावा,

 

गरीब व श्रीमंता मधील विषमता वाढत चालली त्यात समता आणावी या मागण्या बच्चू कडू यांनी सरकारकडे केल्या आहेत. त्यामुळं आता सरकार बच्चू कडू यांच्या या मागण्या मान्य करणार का,’ याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

‘मी कुठं म्हटलं महायुतीत आहे. आम्ही महायुतीला पत्र लिहिणार आहोत. त्याच्याच शेतकऱ्याचे मुद्दे आणि दिव्यांग्यांचे मुद्दे या मागण्या करणार आहोत.

 

 

या मागण्या मान्य झाल्यात तर मी विधानसभा लढणार नाही. माझी सीट मी युतीला देणार,’ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या विधानाने आता संभ्रम निर्माण झाला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *