सोफ्यात, गादीमध्ये, कोट्यवधींचे घबाड;बंडले मोजता -मोजता अधिकारी थकले

In the sofa, in the mattress, crores of rupees; officials are tired of counting the bundles.

 

 

 

 

 

तीन मोठ्या पादत्राणांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या घरी आयकर विभागानं धाड (Income Tax Raid) टाकली आहे.

 

 

 

 

आयकर विभागाच्या कारवाईमध्ये आतापर्यंत 40 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या धाडीत एवढे पैसे सापडलेत की, अधिकारी मशिनच्या सहाय्यानं पैसे मोजून मोजून पुरते थकून गेले आहेत.

 

 

 

आयकर विभागानं शनिवारी एमजी रोडच्या बीके शूज, धाकरणच्या मनशु ​​फूटवेअर आणि हिंग मंडीच्या हरमिलाप ट्रेडर्सवर एकत्रित कारवाई केली.

 

 

 

तिनही व्यावसायिकांच्या घरी सापडलेली नोटांची बंडलं मोजण्यासाठी बँकांकडून नोटा मोजण्याची यंत्र मागवण्यात आलीत,

 

 

 

तरी बंडलं काही संपण्याचं नाव घेईनात. आतापर्यंत 50 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून हा आकडा 100 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

 

 

उत्तर प्रदेशातील आगरामध्ये पादत्राणांचा व्यावसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर आयकर विभागानं केलेली छोपेमारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.

 

 

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 ते 55 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. असा अंदाज व्यक्त केला जातोय की,

 

 

 

तिन्ही चप्पल व्यावसायिकांच्या घरातून जप्त करण्यात येणाऱ्या रोकडेचा आकडा 100 कोटींपर्यंत जाऊ शकतो. व्यावसायिकांच्या घरातील गाद्यांमध्ये, सोफ्यामध्येही रोकड लपवण्यात आली होती.

 

 

 

 

सापडलेली रक्कम मोजण्यासाठी तब्बल अर्धा डझन मशीन सतत काम करत होत्या. पण नोटांची बंडलं काही संपण्याचं नाव घेईनात. दरम्यान, अद्याप आयकर विभागाची कारवाई सुरू आहे.

 

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यावसायिकांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे, त्यांची कंपनी मुख्यत्वे नकदी स्वरुपातच व्यवहार करते.

 

 

 

विशेषतः छोटे विक्रेत्यांसोबत नकदी स्वरुपातील व्यवहार केला जातो. यासाठी कंपनीकडून बिलही दिलं जात होतं होतं. संपूर्ण व्यवहार ब्लॅकमध्ये केला जात होता. पावत्यांमार्फत हिशोब ठेवला जात होता.

 

 

 

 

आयकर विभागानं मुख्यतः हरमिलाप ट्रेडर्स आणि त्यांच्याशी एमजी रोड स्थित बीके शूज, धाकरण येथील मंशु फूटवेअर यांसारख्या व्यावसायिक कंपन्यांवर छापे टाकले आहेत.

 

 

 

 

 

हरमिलाप ट्रेडर्सच्या मालकाच्या घरावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. छापेमारीत आयकर विभागानं काही स्लिप्स जप्त केल्या आहेत,

 

 

 

 

 

ज्याद्वारे लाखो कोटी रुपयांचा व्यवहार केला जात होता. आयकर विभागाच्या छापेमारीत या स्लिप समोर आल्यानं शहरातील इतर व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *