भाजपचा मोठा नेता बाहेर पडण्याच्या तयारीत?

A big leader of BJP is preparing to exit

 

 

 

महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलेलं असताना अनेक ठिकाणी आऊटगोईंग सुरु झालं आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक गळती लागली आहे.

 

कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे, इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत तुतारी हाती घेतली. त्यानंतर आता नवी मुंबईतील

 

दिग्गज नेते गणेश नाईक भाजपमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. ते ठाकरेसेनेत किंवा शरद पवारांच्या पक्षात जाऊ शकतात.

 

ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघ आपल्या कुटुंबासाठी सोडण्यात यावेत, अशी गणेश नाईक यांची मागणी आहे. गणेश नाईक ऐरोलीचे आमदार आहेत.

 

तर मंदा म्हात्रे बेलापूरचं प्रतिनिधीत्व करतात. त्यादेखील भाजपच्या आमदार आहेत. म्हात्रे यांचं तिकीट कापून ते नाईक यांच्या कुटुंबातील सदस्याला दिलं जाण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

 

एकाच कुटुंबातील दोघांना विधानसभेला संधी दिली जाऊ शकत नाही, असा पक्षाचा सूर आहे. त्यामुळे ‘फॅमिली मॅन’ असलेल्या नाईक यांची मागणी पूर्ण होण्याची शक्यता नाही.

 

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी गणेश नाईक यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यावेळीही ते कुटुंबातील दोघांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळावी यासाठी आग्रही होते.

 

पण भाजपनं केवळ गणेश नाईक यांना संधी दिली. राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर नाईक यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. तीदेखील पूर्ण झाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत असताना मंत्रिपद भूषवणाऱ्या नाईक यांना केवळ आमदारकीवर समाधान मानावं लागलं.

 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक यांना संधी मिळावी, अशी भूमिका गणेश नाईक यांची होती. ठाण्यातून लढण्यास ते उत्सुक होते. पण ही जागा शिंदेसेनेला सुटली.

 

त्यामुळे नाईक आणि समर्थक नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षाकडून झाले. नाईक यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा अस्त्र काढलं. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

 

 

गणेश नाईक यांचं नवी मुंबईसह आसपासच्या परिसरावर चांगलं वर्चस्व आहे. नवी मुंबई भाजप म्हणजे सबकुछ नाईक अशी स्थिती आहे.

 

नवी मुंबई महापालिकेत नाईक समर्थक नगरसेवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नाईक यांनी पक्ष सोडल्यास भाजपला मोठा धक्का बसेल. महापालिका निवडणुकीत भाजप बॅकफूटवर जाईल.

 

 

२०१९ मध्ये विधानसभेला शिवसेना-भाजपची युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. ऐरोली, बेलापूरची जागा युतीकडून भाजपनं लढवली.

 

तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात होते. नवी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचीही ताकद आहे. त्यामुळे नाईक शरद पवारांच्या पक्षात किंवा ठाकरेसेनेत जाऊ शकतात.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *