मतदान करण्यासाठी दीड ते 2 तास;मुंबई आणि ठाण्यात मतदान केंद्रावर अभूतपूर्व गोंधळ

1.5 to 2 hours to vote; Unprecedented chaos at polling booths in Mumbai and Thane

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांचा समावेश आहे. पण मुंबई आणि ठाण्यात मतदान केंद्रावर अभूतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळत आहे.

 

 

 

अनेक ठिकाणी रांगाच्या रांगा लागल्या आहेत. ठिकठिकाणी मतदान करण्यासाठी लोकांना दीड ते 2 तास मतदानाला लागत आहे.

 

 

त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर संशय व्यक्त केला आहे. मुंबईसह ठाण्यातील अनेक केंद्रावर मतदारांची गर्दी उसळली आहे.

 

 

 

 

तर काही ठिकाणी लोक मतदानाला वेळ लागत असल्यामुळे घरी परत चालले आहे. पण अनेक सामाजिक संघटनांकडून लोकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

 

देशातला 5 वा आणि महाराष्ट्रात अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडलं. आज मुंबईत पार पडलेल्या 6 ही मतदारसंघात कमी जास्त प्रमाणात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला.

 

 

 

यामध्ये मतदान केंद्रावर झालेल्या गर्दीच नियोजन न करता आल्यानं तासनतास उभ्या असणाऱ्या मतदारांचा रोष आयोगाला सहन करावा लागला आहे.

 

 

 

 

ज्येष्ठ नागरिकांना कसल्याही सोयीसुविधा मिळाल्या नाहीत तर सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येन मतदार बाहेर पडल्यानंतरही मतदान केंद्रावर आलेल्या अडचणींवरून प्रत्येक ठिकाणी तक्रारीचा सूर दिसत होता.

 

 

 

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही गैरसोयीबद्गदल आणि जाणीवपुर्वक मतांचा टक्का कसा कमी होईल

 

 

याबाबत आरोप करण्यात आले. पवईमध्ये उबाठाचे नेते आदेश बांदेकर यांनीही तासनतास ताटकळत उभा रहाव लागत असल्याची तक्रार केली होती.

 

 

 

मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून सूरू झाले आहे.

 

 

 

 

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ३८.७७ टक्के मतदान झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

 

 

 

भिवंडी- 37.06 टक्के
धुळे- 39.97 टक्के
दिंडोरी- 45.95 टक्के

 

 

 

 

कल्याण – 32.43 टक्के
मुंबई उत्तर – 39.33 टक्के
मुंबई उत्तर मध्य – 37.66 टक्के

 

 

मुंबई उत्तर पूर्व – 39.15 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – 39.91 टक्के
मुंबई दक्षिण – 36.64 टक्के

 

 

मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के
नाशिक – 39.41 टक्के
पालघर- 42.48 टक्के
ठाणे – 36.07 टक्के

 

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे विल्होळी गावं येथे आले असता शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध करत घोषणाबाजी केली.

 

 

 

अब की बार मोदी सरकार, जो हिंदू हित की बात करेंगा वही देश पे राज करेंगा आणि मोदी, मोदी…,’हेमंत आप्पा फिरसे’ या घोषणा दिल्या.

 

 

 

 

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या ओशिवरा येथील एका मतदान केंद्रावर स्थानिक आमदार भारतीय लवेकर आणि भाजपच्या नेत्या दिव्या ढोले या मतदान केंद्रात

 

 

 

फिरत असल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून दिव्या ढोले आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मतदान केंद्राबाहेर काढले आहे.

 

 

 

ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर पवईमध्ये मतदानाला गेले होते पण ईव्हीएम मशीन बंद असल्याचं समोर आलंय

 

 

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदे आणि टोमॅटोचा वापर करत मतदान केले. शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी केलेल्या या प्रकाराची चांगली चर्चा रंगल होती.

 

 

 

 

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

 

या तरुणांना मतदान केंद्राचे गेटवरवरच पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत मतदानाला गेले.

 

 

 

कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांचे अनोखे मतदान केले. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

 

 

 

ऐन कांदा काढणीस केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने बाजारपेठेतील बाजारभाव कोसळले होते. परिणामी त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचा परिणाम स्वरुप शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून नाराजी व्यक्त केली.

 

 

 

 

नाशिकमधील दिंडोरीत शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. एका शेतकऱ्याने ईव्हीएममध्ये मतदान करताना चक्क टोमॅटोचा वापर केला.

 

 

 

 

तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मोबाईल बंदी असताना मतदान करतानाचे मोबाईलवर एका शूटिंग केले आहे.

 

 

 

त्याचे मतदान करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टोमॅटोच्या साह्याने बटन दाबून मतदान करतानाचा हा व्हिडिओ आहे.

 

 

 

त्या व्हिडिओत मतदान कोणाला करत आहे, हे सुद्धा दिसत आहे. सकाळी शांतीगिरी महाराज यांनी ईव्हीएमला हार घालून मतदान केले होते.

 

 

 

नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील मतदान केंद्रावर तब्बल अर्धातास ईव्हीएम खराब झाले होते. पाथर्डी फाटा परिसरातील स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रावर अर्धा तास ईव्हीएम मशीन बंद होते.

 

 

 

एव्हीएम मशीन सुरू होत नसल्याने गोंधळ उडाला होता. यामुळे मतदानाला विलंब होऊन नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर मतदानासाठी अर्धा तास वाढवून देण्यात येणार असल्याची मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *