काँग्रेस सोडलेल्या खासदाराने दिल्या काँग्रेसला शुभेच्छा?
MP who left Congress wished Congress?
तारीख होती 14 जानेवारी 2024… या दिवशी मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला. वरिष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी सकाळी- सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
त्याच दिवशी मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र काँग्रेस सोडल्यानंतर चार महिन्यांनी मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर भाष्य केलं आहे.
काँग्रेस पक्षाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यांनी या शुभेच्छा का दिल्या? तसंच लोकसभा निवडणूक अन् देवरा यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी का देण्यात आली नाही? यावरही मिलिंद देवरा यांनी भाष्य केलं.
काँग्रेस माझ्यासाठी आता भूतकाळ आहे. मला आता भविष्यात बघायचे दक्षिण मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट जीएस मतदार संघ आहे. त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो.
तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं की आपण ही जागा गमवायला नको. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला खूप जास्त दबाव टाकला आणि त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. त्यामुळे काँग्रेसला माझ्या शुभेच्छा…, असं मिलिंद देवरा म्हणाले.
दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावरही मिलिंद देवरा यांनी भाष्य केलं आहे. कुठेही घालमेल नाही.
काही संदेश नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिलेली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवल्या त्यामुळे मी फार आनंदी आहे.
यामिनीताई जाधव या फायटर आहेत. यामीन ताई नक्कीच निवडून येतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असा विश्वास मिलिंद देवरा यांनी विश्वास केला आहे.
मतदान धीम्या गतीने झालं हे विरोधकांच्या षडयंत्र आहे. आपली हार झाकण्यासाठी त्या पद्धतीचं वक्तव्य करत आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी ताई निवडून येतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल, असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला आहे.
गेली 45 वर्षात कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव बॅलेट पेपरवर होतं आणि मला गर्व आहे की मी फॅमिली मेंबरसाठी मतदान केलं नाही. तर मी शिवसेनेला धनुष्यबाणाला मत दिलं.
मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिलं. महायुतीकडे पाच पांडव होते आणि या पाच पांडवांनी या ठिकाणी काम केलेला आहे, स्वतः एक पांडव आहे त्यातलाच…
गिरणी कामगार आणि किरण गावातील लोकांचा फार जातील प्रश्न आहे. विकासाचा आणि या विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, न्याय देण्यासाठी काम करायचंय, असंही मिलिंद देवरा म्हणाले.
राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला काँग्रेस पक्ष सोडावा लागला, असा गंभीर आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. “काँग्रेस माझ्यासाठी आता भूतकाळ आहे.
मला आता भविष्यात बघायचे आहे. साऊथ मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट मतदारसंघ आहे आणि त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं की आपण ही जागा गमवायला नको.
पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला खूप जास्त दबाव टाकला आणि त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. काँग्रेसला माझ्या शुभेच्छा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“कुठेही घालमेल नाही. काही संदेश नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिलेली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं. त्यामुळे मी फार आनंदी आहे.
शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनीताई जाधव या फायटर आहेत आणि यामिनीताई नक्कीच निवडून येतील. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही”, असा विश्वास शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.
“एक प्रकारची ही सगळी विचित्र अवस्था होती. गेल्या 45 वर्षात कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव बॅलेट पेपरवर होतं आणि मला गर्व आहे की मी फॅमिली मेंबरसाठी मतदान केलं नाही तर मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत दिलं.
मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिलं”, असं मिलिंद देवरा म्हणाले. “महायुतीकडे पाच पांडव होते आणि या पाच पांडवांनी या ठिकाणी काम केलेलं आहे.
मी स्वतः एक पांडव आहे त्यातलाच. गिरणी कामगारांचा फार जटील प्रश्न आहे. विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी काम करायचं आहे”, असंही मिलिंद देवरा म्हणाले.
“ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येणार नाहीत. 2014, 2019 नंतर त्यांनी काही कामे केली नाहीत. ते मोदी लाटेत निवडून आले. त्यांचा कुठलाही जनसंपर्क नाही.
त्या भागात कधी फिरत नाहीत. लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी ते कुठलंही काम करत नाहीत. त्यांनी नागरिकांसाठी कोणतीही बैठक बोलावली नाही.
त्यांनी ना बीएमसीसोबत ना म्हाडासोबत बैठक बोलावली नाही. त्यांनी गृहनिर्माण मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यासोबत नागरिकांच्या घरांच्या समस्येवर बैठक आयोजित केली नाही. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचललं नाही. मग जनतेला न्याय मिळणार कसा?”, असा सवाल मिलिंद देवरा यांनी केला.