राहुल गांधींना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
Election Commission issued notice to Rahul Gandhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील एका टीकेमुळे कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकाची फायनल गमावल्यानंतर पंतप्रधान मोदींवर राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली होती.
याविरोधात भाजपने निवडणूक आयोगात तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली असून निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे.
टीम इंडिया वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभूत होण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. अशी टीका करतना काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर अक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली होती.
भारतीय संघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लकी नाहीत, ते उपस्थित होते, त्यामुळेच आपला संघ पराभूत झाला असे विधान राजस्थानमधील प्रचार सभेत केले होते.
राहुल गांधींच्या पनोती या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राहुल गांधींनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य लज्जास्पद, निषेधार्ह आणि अपमानास्पद असल्याचं माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले होते.
तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया, भाजप नेते ओम पाठक आणि राधा मोहन दास अग्रवाल यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.
दरम्यान, भाजपच्या या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाकडून या प्रकरणी राहुल गांधींना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत (२५, नोव्हेंबर) स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.