नितीश कुमार मोदींबाबत असं काही बोलले कि व्यासपीठावरील सर्वच झाले अवाक !
Nitish Kumar said something about Modi that left everyone on the platform speechless

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. निवडणूक रॅलीला संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले की, पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे.
पटना साहिब मतदारसंघातून एनडीए समर्थित भाजप उमेदवार रविशंकर प्रसाद यांच्या बाजूने निवडणूक रॅलीला नितीश कुमार संबोधित करत होते.
निवडणूक सभेला संबोधित करताना नितीश कुमार म्हणाले, “आमची इच्छा आहे की आम्ही देशभरात 400 हून अधिक जागा जिंकू
आणि नरेंद्र मोदी जी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. देशाचा विकास झाला पाहिजे, बिहारचा विकास झाला पाहिजे, सर्वकाही झाले पाहिजे.”
मंचावर उपस्थित नेत्यांनी नितीशकुमार यांना झालेल्या चुकीची माहिती दिली त्यानंतर नितीश कुमार यांनी स्वतःला दुरुस्त केले आणि मोदींनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावे,
असा त्यांचा अर्थ होता. नितीश म्हणाले, “नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांनी पुढे जावे, असे आम्ही म्हणत आहोत. आम्हाला हेच हवे आहे.”
काही दिवसांपूर्वी चिराग पासवान यांच्या समर्थनार्थ रॅलीला संबोधित करताना नितीश कुमार यांनी चुकून रामविलास यांच्यासाठी मते मागितली होती.
मात्र, चूक लक्षात येताच त्यांनी स्वत:ला सुधारले. चूक दुरुस्त करताना नितीश म्हणाले, “फोटो रामविलास पासवानचा आहे, पण आता तुम्हाला रामविलास यांचा मुलगा चिराग यांना मतदान करावे लागेल.
याआधीही अनेक सभांमध्ये नितीशकुमार यांची जीभ घसरली होती. एनडीए चारशेहून अधिक जागा जिंकण्याऐवजी चार हजार जागा जिंकेल, अशी घोषणा नितीशकुमार यांनी अनेक सभांमध्ये केली आहे.