एक्झिट पोल पूर्वीच काँग्रेस नेत्याचा मोठा दावा,म्हणाले…
Congress leader's big claim even before the exit poll, said...
आज शनिवारी, 1 जून रोजी लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार असून येत्या 4 जून रोजी देशात सत्ता कुणाची येणार हे स्पष्ट होणार आहे.
मात्र त्याआधी एक्झिट पोलचे निकाल आज सायंकाळी पाच वाजल्यापासून टीव्ही वृत्तवाहिन्यांवर दाखवले जातील. वृत्तवाहिन्यांवर या निकालांवर चर्चा सुद्धा होईल.
मात्र, काँग्रेस पक्षाने या चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील वरिष्ठांचा आदेश असेल तर एक्झिट पोल ला जाणार नसल्याचे सांगितले आहे. तर वरिष्ठांनी विचार करूनच निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भाजपला महाराष्ट्रात जेमतेम आठ जागा मिळतील त्यापेक्षा एकही जागा मिळणार नाही. अशा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी या आधीच बोलून दाखवला आहे.
तर आज एक्झिट पोल बाबत बोलताना ते म्हणाले की, देशात बदलाचे वारे आहेत. त्यामुळे देशात आणि राज्यात इंडिया आघाडीचेच सरकार येणार, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती भयावह आहे. हसन मुश्रीफ अजूनही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागत आहेत.
मात्र आतापर्यंत त्यांनी परवानगी का मागितली नाही. हे नियम शिथिल करण्यासाठी परवानगी मागत नाही तर टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आज काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ पाहणी समितीची बैठक पार पडली.
या बैठकीला काँग्रेसच्या नेत्यांची नागपूरमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला नागपूर विभागातील सदस्य माजी मंत्री नितीन राऊत,
सुनील केदार, रणजित कांबळे, विकास , ठाकरे, अभिजित वंजारी, प्रतिभा धानोरकर, अशोक धोटे, अतुल कोटेजा, सहसराम कोरटे व सुधाकर अडबाले उपस्थित राहणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.