महायुतीच्या उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

A case has been filed against the Mahayuti candidate

 

 

 

 

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील मतदानाची सांगता झाली. त्यानंतर, आज लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात मतदान होत आहे.

 

 

 

 

उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाबसह अनेक मतदारसंघात मतदान सुरू आहे. राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर महाराष्ट्रातील नेतेमंडळी शांत झाली आहे.

 

 

 

 

आरोप-प्रत्यारोपांची मालिका काही काळ संपल्याचं दिसून येत आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांवर हल्लाबोल करणारे नेते आता निवडणूक निकालाची प्रतीक्षा करत आहेत.

 

 

 

 

 

मात्र, निवडणूक आयोगाकडून अद्यापही निवडणूक प्रचारकाळातील घटनांवर कारवाई होताना दिसून येते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

विनापरवाना सभा घेतल्यामुळे अर्चना पाटील यांच्यावर प्रचारसभेच्या तब्बल 43 दिवसांनी हा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

 

 

लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना महायुतीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

त्यामुळे, अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनापरवाना सभा घेतल्याने आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे.

 

 

 

 

मात्र, हा गुन्हा तब्बल 43 दिवसांनी दाखल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. धाराशिवच्या आनंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अधिनियम कलम 188, 34 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

अर्चना पाटील यांनी 19 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठं शक्तीप्रदर्शन करुन, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि दिग्गज नेतेमंडळींच्या उपस्थितीत पाटील यांनी रॅली काढली होती.

 

 

 

 

त्यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री तानाजी सावंत हेही रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीनंतर जाहीर सभा घेऊन उपस्थितांना संबोधित करण्यात आले.

 

 

 

 

त्यामध्ये, अजित पवार, तानाजी सावंत आणि उमेदवार अर्चना पाटील यांचीही भाषणं झाली होती. त्यामुळे, या रॅलीचे रुपांतर जाहीर सभेत झाल्याचं दिसून आलं. मात्र, आता हीच सभा उमेदवाराच्या अंगलट आल्याचं दिसून येत आहे.

 

 

 

 

निवडणूक प्रचारादरदम्यान उमेदवारी अर्ज भरताना महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावतीने केवळ रॅलीचीच परवानगी काढण्यात आली होती.

 

 

 

 

मात्र, सभेची कुठलाही परवानगी त्यांनी काढली नव्हती. तरीही रॅलीनंतर जाहीर सभा घेण्यात आल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. उमेदवार अर्चना पाटील

 

 

 

 

आणि त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लातुरे यां दोघांविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *