BREAKING NEWS; दहावी-बारावीच्या परीक्षेत होणार मोठा बदल ?

There will be a big change in the 10th-12th exam?

 

 

 

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला जाणार आहे. आता त्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होतील. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होईल.

 

 

 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी आगामी २०२४-२५ किंवा २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

 

 

 

दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये त्या परीक्षांची नेहमीच चिंता असते आणि पालकांवरही ताण असतो. अनेकजण विशेषत: मुली अनुत्तीर्ण झाल्यावर अर्ध्यातूनच शिक्षण सोडतात.

 

 

 

या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा,

 

 

अभ्यासक्रमासह इतर १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागविली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का?

 

 

 

बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी,

 

 

 

असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर त्यांची मते मागवून घेतली आहेत. त्याचा विचार करून दोन वर्षांत नवीन पद्धत अवलंबली जाणार आहे.

 

 

 

नवीन अभ्यासक्रमात पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून,

 

 

 

 

विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  सांगितले.

 

 

 

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच अध्यापन करतील. पण, पदवी तथा पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीनेच होतील.

 

 

 

पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेले जाणार असून पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. तत्पूर्वी, त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून

 

 

 

 

बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.

 

 

 

विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होईल

एका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात त्यांना जास्त अभ्यास करण्याची संधी

 

 

 

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्ध्यातून शाळा सोडणे थांबेल

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *