आनंदाची बातमी; महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन हवामान विभागाची माहिती

good news; Arrival of Monsoon in Maharashtra Information of Meteorological Department

 

 

 

 

राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.

 

 

 

 

नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

 

 

 

राज्यात अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यात कधी पावसाचे आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती.

 

 

 

अखेर आज पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले होते. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता.

 

 

 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण,

 

 

 

 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

 

 

राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह मकाठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊास झालाय. याचा शेती पितांना देखील मोठा फटका बसताना दिसत आहे.

 

 

 

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. जिल्ह्यातील खामगाव, शेगाव , संग्रामपूर या परिसरात रात्रभर पावसाच्या सरी सुरू होत्या.

 

 

संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या परिसरात वादळी वाऱ्याने शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्यामुळं

 

 

 

आणि पावसामुळं काढणीला आलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. तसेच भाजीपाला पिकांचंही नुकसानं झालं आहे. यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

 

 

 

 

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होतं आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे.

 

 

 

दरम्यान, माहितीप्रमाणे 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

 

 

 

राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव,

 

 

 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे.

 

 

 

9 ते 14 जून दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, पुणे, कोकण, नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई येथील काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज आहे.

 

 

 

धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या भागातही या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात झाली असून 14 जून पर्यंत राज्यात पाऊस सुरू राहणार आहे.

 

 

 

 

सध्या पडणारा पाऊस हा भाग बदलत पडणार पाऊस आहे. या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस होण्याची दाट शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. म्हणजेच जून महिन्यातच अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या होण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.

 

 

 

सध्या राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात मान्सूनच आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

त्यापूर्वीच राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे.

 

 

 

याचा शेती पिकांना देखील फटका बसत आहे. भाजीपाला पिकांसह फळबागांचं अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *