पाहा राष्ट्रपतींकडून शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका
Check out the invitation card for the swearing-in ceremony by the President

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा रविवार, ९ जून रोजी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज व मनोरंजन विश्वातील कलाकारांसह आठ हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटक पक्षांनी पाठिंब्याचे पत्र सादर केले.
त्यानंतर मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. देशातील अन्य राजकीय पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण ८००० हजार लोक
सोहळ्याला उपस्थित राहाणार असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
दरम्यान राष्ट्रपतींकडून या शपथविधी सोहळ्याची निमंत्रणपत्रिका सर्वांना पाठविण्यात आलेली आहे. ती पत्रिका पाहा