आता सरकारी कर्मचारी ऑफिसला 15 मिनिटे उशीरा पोहोचल्यास अर्ध्या दिवसाचा पगार
Now government employees get half day pay if they reach office 15 minutes late
ऑफिसला उशिरा पोहोचणाऱ्यांवर आता केंद्र सरकार कारवाईचा बडगा उगारणार आहे. केंद्र सरकारकडून स्पष्ट बजावण्यात आलंय की १५ मिनिटांपेक्षा जास्त उशिराने ऑफिसला येणाऱ्यांना माफ केले जाणार नाही.
त्यांनी कारवाईसाठी तयार रहावं. देशभरातील कर्मचाऱ्यांना सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याचे आणि आपली हजेरी नोंदवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक सिस्टिमचा वापर करण्यास सांगण्यात आलंय. कोरोना काळापासून बायोमेट्रिक सिस्टिम बंद करण्यात आली होती.
केंद्र सरकारच्या डीओपीटी विभागाने जास्ती जास्त १५ मिनिटं उशिर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे की, सव्वा नऊ वाजेनंतर ऑफिसला येणाऱ्यांची अर्धा दिवसच हजेरी धरली जाईल.
सरकारी कर्मचाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, कोणत्याही कारणाने एखादा कर्मचारी ऑफिसमध्ये आला नाही तर त्याला याची माहिती द्यावी लागेल. सुट्टीसाठी अर्ज करावा लागेल.
केंद्र सरकारची ऑफिसेस सकाळी ९ ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत सुरू असतात. मात्र ज्युनिअर कर्मचारी उशिरा येणं आणि लवकर जाण्याचे प्रकार सुरू असतात.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे असते की, ऑफिसची निश्चित अशी वेळ नाही. आम्ही घरीही काम घेऊन जातो. सायंकाळी सात वाजल्यानंतर निघतो. याशिवाय कोरोनानंतर इलेक्ट्रॉनिक फाइल्सवर सुट्टीच्या दिवशी किंवा विकेंडला घरातून काम करतो.
२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने ऑफिसला वेळ लागू करण्याची मागणी केली होती. याला कर्मचाऱ्यांकडून विरोधही झाला होता. काहींनी म्हटलं होतं की बराच प्रवास करून आम्ही ऑफिसला येतो.
कर्मचारी, अधिकारी वेळेत ऑफिसला यावेत यासाठी बायोमेट्रिक सिस्टिम लावण्यात आली होती. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची हजेरी लावण्यासाठी लाइनमध्ये उभा रहावं लागतं म्हणून आपल्याच टेबलवर बायोमेट्रिक डिव्हाइस लावलं होतं.