उकाड्याचा फटका;मुंबईतही विजेची लोडशेडिंग

Hit by heat; load shedding of electricity in Mumbai too

 

 

 

 

मुंबईत वीज आणणाऱ्या वाहिन्या जुन्या असल्याने त्यात बिघाडाच्या घटना वारंवार घडत असतात. बुधवारीही विजेचा भार सहन न झाल्याने पडघ्याहून कळव्याला येणाऱ्या ४०० केव्ही क्षमतेच्या वाहिनीवर दबाव आला

 

 

 

व त्यामुळे १६३ मेगावॉट वीजप्रवाह थांबला. परिणामी अत्यधिक उष्णता व उकाड्याच्या स्थितीत नवी मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवली महापालिका भागातील ५० हजारांहून अधिक ग्राहकांना भर दुपारी दोन तास सक्तीचे भारनियमन सहन करावे लागले.

 

 

 

 

मुंबईत वीज आणणाऱ्या प्रत्येकी ४०० किलोव्हॅटच्या (केव्ही) चार वाहिन्या आहेत. त्यातील दोन वाहिन्या पडघा ते कळवा दरम्यान आहेत.

 

 

 

 

 

या वाहिन्यांमधून येणारी वीज कळव्यानंतर पुढे २२० केव्ही क्षमतेच्या वाहिन्यांद्वारे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई व एकूणच महामुंबई प्रदेशातील विविध भागांत पोहोचविली जाते.

 

 

 

 

 

सध्या महामुंबई परिसरात उष्णतेची लाट आहे. त्यामुळे ग्राहकांकडून विजेची मागणी वाढती आहे. या स्थितीत दुपारी २.२५ वाजता मुंबईची (केवळ मुंबई महापालिका क्षेत्र) वीजमागणी ३९०० मेगावॉट असताना

 

 

 

 

 

पडघा-कळवा या एका वाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे भार येऊन वीजप्रवाह बंद झाला, मात्र त्याचा फटका मुंबईला बसण्याऐवजी महामुंबई प्रदेशातील चार २२० केव्ही वाहिन्यांना बसला.

 

 

 

 

महापारेषणच्या माहितीनुसार, दुपारी २.२५ वाजता कळवा येथे येणाऱ्या वाहिनीचा वीजप्रवाह बंद पडल्यानंतर २२० केव्ही क्षमतेच्या वाशी, कलर केम (ठाणे), महापे व टेमघर

 

 

 

 

या वाहिन्यांचा अनुक्रमे १२ मेगावॉट, ६० मेगावॉट, ३१ मेगावॉट व ६० मेगावॉट यानुसार एकूण १६३ मेगावॉट वीजप्रवाह ठप्प झाला. हा प्रवाह ठप्प होताच महापारेषणची सुरक्षा प्रणाली तत्काळ कार्यान्वित झाली.

 

 

 

 

त्याचवेळी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी वेळोवेळी माहिती घेत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी

 

 

 

 

आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. याद्वारे लवकरात लवकर वीजप्रवाह सुरळीत करण्याच्या दृष्टीने तातडीची पावले उचलण्यात आली.

 

 

 

दरम्यान, दुपारी ४ नंतर ऊन थोडे कमी झाल्यावर विजेची मागणीही कमी झाली. त्यामुळे महापे येथील वाहिनीचा पुरवठा दुपारी ३.५५, वाशी येथील वीजपुरवठा दुपारी ४.०५, कलर केम वाहिनीचा पुरवठा

 

 

 

 

दुपारी ४.०८ व टेमघर वाहिनीचा पुरवठा दुपारी ४.१५ वाजता सुरळीत करण्यात आला. त्यानुसार या वाहिनींशी संबंधित ५० हजारांहून अधिक ग्राहकांकडे सक्तीचे भारनियमन करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

 

 

 

दोन दिवस मुंबईकर उकाड्याने हैराण झाल्यानंतर बुधवारी कमाल तापमानाचा पारा घसरला. परिणामी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.

 

 

 

मात्र आणखी दोन दिवस उष्मा व आर्द्रतेची स्थिती कायम राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर आज, गुरुवारी ठाणे व मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

मुंबईत वीज आणणाऱ्या चारपैकी दोन वाहिन्यांवर नवीन कंडक्टर्स बसविण्यात आल्याने त्यांची क्षमता २४०० मेगावॉटच्या घरात गेली आहे.

 

 

 

तर, दोनपैकी एक वाहिनी एचटीएलएसमध्ये परावर्तित करण्यात आली आहे. त्यामुळे तिची क्षमता १२०० मेगावॉटच्या घरात गेली आहे.

 

 

 

 

असे असतानाही ३९०० मेगावॉटच्या विजेतच बिघाड झाला. याहून अधिक ४०७० मेगावॉट कमाल वीजमागणी मंगळवारी होती, हे विशेष.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *