NIA च्या पथकाने टाकली चक्क भिकाऱ्याच्या घरावर धाड

The NIA team raided the beggar's house

 

 

 

 

सोमवारी सकाळी एनआयएच्या पथकाने हल्दीबारी येथे भीक मागून खाणाऱ्या राखी बर्मनच्या घरावर छापा टाकला. यावेळी एनआयए टीमसोबत हल्दीबारी पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

 

राखी बर्मन यांचा मुलगा विश्वजीत बर्मन याचे नाव अवैध कामांमध्ये पुढे आलंय. विश्वजीतच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून विश्वजीतची आई राखी बर्मन ही भीक मागण्याचं काम करते.

 

मात्र, विश्वजीत हा अत्यंत साधा मुलगा असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. तो केटरिंगमध्ये काम करत असून तो सध्या घरी नसल्याची माहिती आहे.

विश्वजीत बर्मन याची आई राखी बर्मन यांनी सांगितले की, तो कामानिमित्त बाहेर गेला आहे. छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांनी राखीला काही कागदांवर स्वाक्षरी करायला लावल्याचा दावा राखीने केलाय.

 

राखी म्हणाली, “त्यांनी माझे दार उघडले आणि माझी पायघोळ पाहिली. नवऱ्याचे बँकेचे पुस्तक पाहिले. मुलगा हा कामानिमित्त बाहेर आहे.”

 

शेजारी राहणाऱ्या मलय दास यांनी सांगितले की, आज मी पाहिले की बीएसएफ आणि वरिष्ठ अधिकारी या घरात आले होते.

 

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये तपासादरम्यान सहा जणांना अटक केली होती. हे सर्व बांगलादेशचे नागरिक आहेत.

 

देशात बनावट भारतीय कागदपत्रांचा वापर करुन ते राहत असल्याचा आरोप आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर एटीएसला खळबळजनक माहिती मिळाली. वैध बांगलादेशी पासपोर्टसह त्यांनी भारतात प्रवेश केला. कट्टरवादी संघटनांशी त्यांचा संबंध होता.

 

 

आरोपींनी आसाम आणि उत्तर बंगालमधून भारतात प्रवेश केल्याचे तपासात समोर आले आहे. शोध सुरू असताना एका महिलेसह दोन नावे समोर आली, जे ‘अल कायदा’चे ‘हँडलर’ आहेत.

 

ते सतत त्याच्या संपर्कात होतो. एआयएने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्याच आधारे कूचबिहार येथील विश्वजीत बर्मन याच्या घराची झडती घेण्यात आली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *