मायक्रोसॉफ्ट मुळे जगभरात बँका, विमानतळांचे काम बंद

Banks, airports shut down worldwide due to Microsoft

 

 

 

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे.

 

यामुळे जगभरातील बॅंका आणि विमानतळांचं कामदेखील खोळंबलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

 

एक्स या समाजमाध्यावर पोस्ट शेअर करत अनेक यूजर्सने याबाबत तक्रार केली आहे. काम करत असताना अचानक त्यांचे लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

तसेच तुमचा संगणक अडचणीत असून रिस्टार्ट करणे आवश्यक आहे, असे संदेश स्क्रीनवर येत असल्याचेही या यूजर्सने सांगितले आहे.

 

क्राऊड स्क्राइक अपडेटनंतर येत आहे, ही समस्या येत असल्याची तक्रारही काही यूजर्सद्वारे करण्यात करण्यात आली आहे.

 

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने या तक्रारींची दखल घेतली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मायक्रोसॉफ्टने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

 

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील संगणक आणि लॅपटॉप प्रभावित झाले आहेत. आम्ही याची दखल घेतली असून याबाबत माहिती घेत आहोत. लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कंपनीने म्हटलं आहे.

 

क्राऊडस्ट्राईकने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. आम्ही या तक्रारींची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सुचना येत नाही, तोपर्यंत वाट यूजर्सनी वाट बघावी,

 

 

असे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. याबरोबरच विंडोजवर चालणाऱ्या संगणकांमध्ये बीएसओडीची समस्या निर्माण झाली असून यूजर्सनी स्वत:हून या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सुचनादेखील त्यांनी केली आहे.

 

 

 

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत झालेल्या या बिघाडाचा फटका भारतासह जगभरातील बॅंका आणि विमान सेवेलाही बसला आहे. मुंबईसह देशभरातील अन्य काही महत्त्वाच्या विमानतळांवर सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती आहे.

 

 

त्यामुळे प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. स्पाईसजेटनेही विमानसेवा ठप्प झाल्याचे म्हटलं आहे. विमानसेवेबरोबरच बॅंकांचे व्यवहारदेखील ठप्प झाले आहेत.

 

 

 

 

जागतिक ख्यातीच्या मायक्रोसॉफ्ट या आयटी कंपनीचा सर्व्हर ठप्प झाला असून विंडोज या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये जगभरात अडचणी येत असून संपूर्ण सिस्टिम कोसळली आहे.

 

त्यामुळे जगभरातील विमानसेवा, बँका आणि इतर सर्व ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या आहेत. विडोंज ऑपरेटिंग सिस्टिम वापरणारे

 

लाखो वापरकर्ते आता त्यांचा लॅपटॉप बंद झाल्याची तक्रार करत आहेत. नुकत्याच क्राऊड स्ट्राईक या अपडेटमुळे हे घडले असल्याचे बोलले जात आहे.

 

 

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटसच्या माहितीनुसार, Azure backend workloads मध्ये काही बदल केल्यानंतर स्टोरेज

 

 

आणि कंम्प्युट रिसोर्समध्ये आता व्यत्यय निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून मायक्रोसॉफ्ट ३६५ या ऑपरेटिंग सिस्टिमवर अवलंबून असलेल्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.

 

 

 

क्राऊडस्ट्राईक अभियंत्याकडून सदर समस्येचे मूळ शोधून आता त्यावरील बदल करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्या मशीन बंद झाल्या आहेत, त्यांनी यापुढे काय करावे? यासाठीच्या सूचना विंडोजकडून देण्यात आल्या आहेत.

 

 

Microsoft outage मधून मार्ग काढण्यासाठी हे करू शकता?
१. सेफ मोडमध्ये जाऊन विंडोज Boot करा

 

 

२. C:\Windows\System32\drivers\CrowdStrike directory यावर नेव्हिगेट करा

 

 

 

३. C-00000291*.sys ही फाईल वरील फोल्डरमध्ये शोधून ती डिलीट करा.

४. पुन्हा Boot करा.

 

 

मायक्रोसॉफ्टने एक्सवर सविस्तर पोस्ट करून ही समस्या का उद्भवली आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत. याची माहिती दिली. त्यांनी सांगितले,

 

 

मायक्रोसॉफ्टच्या ३६५ ॲप्स आणि सेवा वापरताना युजर्सना अडचणी येत आहेत. आम्ही या समस्येचा तपास करत आहोत. ही समस्या सोडविण्यासाठी

 

आम्ही पर्यायी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यायी यंत्रणा उभारताना त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. या समस्येवर उपाय शोधत असून युजर्सच्या अडचणी हळुहळु कमी होतील.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *