मुसळधारचा इशारा;पुढचे ७२ तास महत्त्वाचे;हवामान विभागाचा अंदाज
Heavy rain warning; next 72 hours important; Met department forecast
जून महिन्यात पावसाचा लपंडाव सुरु होता. मात्र, आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
इतकंच नाही तर पुढील ७२ तास हे राज्यासाठी महत्त्वाचे असून यादरम्याव वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या ७२ तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळतील,
त्यामुळे या विभागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत पावासाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
गेल्या २४ तासात राज्यात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
तसेच, ३ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज (१ जुलै) मुंबई, ठाणे, रायगड, पुणे,
सिंधुदुर्गात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या (२ जुलै) पुण्यातील घाट माध्यावर पाऊस कोसळेल.
भुशी डॅम ओव्हर फ्लो, पाण्याच्या प्रवाहात पर्यटक वाहून गेले, शोधकार्य सुरु
त्याशिवाय, विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातुरात पावसाचा अंदाज आहे.
तर नाशिक, धुळे, नंदुरबारमध्येही पावसाचाी शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस नाशिक विभागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
1 jul, latest satellite obs at 12.15 night, indicate scattered type, mod to intense clouds over the parts of central India, including parts of southern peninsula too.
NE region also cloud covered.
Watch for IMD updates pl. pic.twitter.com/Mhf0wQBncJ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 30, 2024