सातशे रुपयांची लाच घेतांना लिपिकाला अटक
A clerk was arrested while accepting a bribe of seven hundred rupees

भूसंपादनाचा ना हरकत दाखला देण्यासाठी सातशे रुपयांची लाच स्वीकारताना येवला येथील अव्वल कारकून जनार्दन भानुदास रहाटळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांचे चुलत चुलते यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला येथे भूसंपादनाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता.
दाखला देण्याच्या मोबदल्यात जनार्दन रहाटळ यांनी दि. 3 जुलै रोजी अकराशे रुपयांची मागणी केली. शंभर रुपये स्वीकारून उर्वरित हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याशी संपर्क साधला असता पडताळणी कारवाई दरम्यान रहाटळ यांनी तडजोडीअंती 700 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.
लाचेची रक्कम उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला येथे स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध येवला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.