मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार
The names of these railway stations in Mumbai will be changed
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात विधिमंडळात अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर केली जाणार आहेत.
आज विधानपरिषदेत कामकाज सुरू झाल्यानंतर सर्वात आधी नवनिर्वाचित शिक्षक आणि पदवीधरमधून निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.
त्याचबरोबर मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या नामंतरणाबाबत करण्यात आलेल्या शासकीय ठरावही आज विधान परिषदेत ठेवला जाणार आहे. या ठरावात मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावं बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
करीरोड : लालबाग रेल्वे स्थानक
सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाचं नाव बदलून डोंगरी रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव
पश्चिम मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
मरीन लाईन रेल्वे स्थानक : मुंबादेवी रेल्वे स्थानक
चर्नीरोड रेल्वे स्थानक : गिरगांव रेल्वे स्थानक
हार्बर मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव : काळाचौकी रेल्वे स्थानक
डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे : माझगांव रेल्वे स्थानक
किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे : तीर्थकर पार्श्वनाथ स्थानक