मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर ! इच्छुकांची केविलवाणी अवस्था

The carrot of cabinet expansion! Exclusive status of aspirants

 

 

 

 

विधानसभेच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी धाकधूक युतीतील आमदारांना लागून राहिली आहे. जानेवारीपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचे तर्क वितर्क मांडले जात आहेत

 

मात्र जून संपला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी काही चिन्हे दिसून येत नाहीत. अशातच सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतून मंत्रिमंडळ विस्तार विधानसभेच्या तोंडावर न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

मध्यंतरी शिंदे आणि अजित पवार दिल्लीवारीला गेल्याचे आढळून आले होते याच दरम्यान मंत्रिमंडळांचा विस्तार करु नये असा आदेश युती सरकारला दिल्लीतून दिल्याचे कळत आहे.

 

 

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिलेल्या प्रतिक्रियेत युतीतील नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला पाहिजे अन्यथा युतीतील आमदार नाराज होतील असे विधान केले होते.

 

अशातच आता दिल्लीच्या आदेशावरुन राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न करण्याचे युतीतील नेत्यांनी ठरवल्याचे कळते. दरम्यान

 

पंढरीत आषाढी एकादशी निमित्त पूजेला गेलेल्या सीएम शिंदेंना पत्रकारांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, “लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तुम्हाला याबद्दलची माहिती देईन.”

 

 

संजय शिरसाट म्हणाल्याप्रमाणे युतीत अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची आस लागून राहीली आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने अनेकजण नाराज असल्याचे सुद्धा समजत आहे.

 

 

आता मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून नकार देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे. युतीत असलेले अनेक आमदारांना मंत्री पद मिळण्याची आशा मावळली आहे त्यामुळे काही आमदारांमध्ये उघड उघड नाराजी आढळून येते.

 

आता दिल्लीतून जरी असा निर्णय घेण्यात आला तरी काही आमदारांना मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी आशा लागली आहे.

 

विधानसभेच्या निवडणुकांसाठी अवघे तीन ते चार महिने राहिले आहेत अशातच लोकसभेच्या निकालानंतर महायुतीने विधानसभेसाठी सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे.

 

अशातच आता प्रत्येक पक्षाकडून २८८ जागांवर स्वबळाची चाचपणी सुरु झाली आहे. पुन्हा महायुतीचे सरकार येईलच अशा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *