मराठ्यांना OBC तुन आरक्षण दिल्यास राजकारणातून संन्यास घेणार; राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा

Marathas will retire from politics if OBCs give them reservation; NCP leader's warning

 

 

 

 

आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही,

 

म्हणूनच मी त्याग करेल, असं गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रस अजित पवार गाटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

 

या देशात आरक्षण, हे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही.

 

लोकसभेच्या निवडणुकीत उगीचच अपप्रचार एवढा झाला, की लोकं त्याला बळी पडलेत. पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे

 

आणि आमच्यासारखे अनेक लोक जे संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेली आहेत, ते असं होऊ देणार नाही. असं स्पष्ट वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. ते भंडाऱ्यात बोलत होते.

 

मराठ्यांना आरक्षण मिळालंचं पाहिजे, यावर आमचे सरकार ठाम आहे. त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित झाला, कायदा पण बनला असून दहा टक्के आरक्षण दिले आहे.

 

आता ज्यांना तेही पटत नाही, ते विरोधाभास करतात. हेही तेवढेच सत्य आहे. काँग्रेस आणि इतर सर्वच पक्ष हे अनेक वर्ष सत्तेत राहिले आहेत.

 

मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कालचा, आजचा नाही, तो फार जुना आहे. वर्षानुवर्षी या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आलेली आहे.

 

ज्यांच्याकडून आता मागणी जोर धरू लागली आहे. त्या समाजाचे खंबीर नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्रात राहिलेले आहेत. किंबहुना अनेक पक्षात राहिलेले आहेत.

 

त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही दिलं. पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका करायची. कारण ते स्वतः देऊ शकले नाही,

 

मात्र आता चुका काढत बसायचं. आता निवडणुकीच्या काळामध्ये विरोध करायचा, हा एकच मुद्दा बनल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांवर केली.

 

महाराष्ट्रात तिन्ही पक्ष महायुती म्हणून काम करत आहेत आणि यशस्वीरीतीने या महाराष्ट्रमध्ये निवडणूकमध्ये सामोरे जाणार. महाराष्ट्रमध्ये आपले सरकार बनवणार, असं वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचारांचे सरदार असा आरोप केला होता. त्यावर शरद पवार यांनी जोरदार प्रतिउत्तर देत अमित शहा यांना तडीपार असं म्हटलं होते. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांनी अधिक बोलण्याच मात्र टाळलं

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *