राहुल गांधींचं मोदी सरकावर टीका म्हणाले भाजपा देशातील जनतेला चक्रव्यूहात अडकवत आहे

Rahul Gandhi's criticism of the Modi government said that the BJP is trapping the people of the country in a maze

 

 

 

ज्याप्रमाणे चक्रव्यूहात अडकवून अभिमन्यूला मारण्यात आलं, त्याप्रमाणे देशातील जनतेलाही चक्रव्यूहात अडकवलं जात आहे.

 

या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान मोदी आणि इतर पाच जणं आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं.

 

“महाभारतात चक्रव्यूहात अडकवून अभिमन्यूला मारण्यात आलं होतं. आज २१ व्या शतकातही एक चक्रव्यूह तयार केला जातो आहे. हा चक्रव्यूह कमळाच्या फुलाच्या आकाराचा आहे.

 

त्याचे चिन्ह पंतप्रधान मोदी आपल्या छातीवर लावून फिरतात. जे अभिमन्यूबरोबर करण्यात आलं, तेच आज देशातील जनतेबरोबर केलं जात आहे.

 

देशातील तरूण, शेतकरी, महिला, छोटे उद्योगपती, यांना एका चक्रव्यूहात अडकवलं जात आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

 

“ज्याप्रमाणे अभिमन्यूला सहा जणांनी चक्रव्यूहात अडकवून मारलं. त्याप्रमाणे आजच्या चक्रव्यूहातही सहा जण काम करत आहेत. हे चक्रव्यूह पंतप्रधान मोदी,

 

मोहन भागवत, अजित डोवाल, अमित शाह, अदानी आणि अंबानी, असे सहा जण चावलत आहेत. देशात आज भितीचं वातावरण आहे”, असेही ते म्हणाले.

“२१ व्या शतकातील चक्रव्यूहामागे तीन शक्ती काम करत आहेत, एक म्हणजे भांडवलदारांची एकाधिकारशाही, दुसरं म्हणजे देशातील तपास संस्था आणि तिसरं म्हणजे राजकारण शक्ती.

 

आज संपूर्ण देशाची संपत्ती केवळ दोन तीन व्यक्तींच्या हातात आहे, देशातील तपास संस्थांचा वापर करून विरोधकांवर दबाव आणला जातो आहे”, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

 

“मोदी सरकारच्या चक्रव्यूहने सर्वप्रथम या देशातील छोट्या व मध्यम व्यावसायिकांवर हल्ला केला. हे तेच व्यावसायिक आहेत, जे देशातील लाखो तरुणांना रोजगार देतात.

 

नोटबंदी आणि जीएसटी लागू करून त्यांचे व्यवसाय या सरकारने बंद पाडले. त्यामुळे कितीतरी तरुण बेजोरगार झाले. या उद्योगांसाठी सरकारने या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही”, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

 

आज देशातील तरुणांपुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारी आहे. स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होत आहेत. गेल्या १० वर्षात ७० वेळा या परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत.

 

या पेपर फुटीबाबत या अर्थसंकल्पात एक शब्दाचाही उल्लेख नाही. सरकारने तरुणांसाठी अग्नीवीर योजना फसवलं. या अर्थसंकल्पात अग्नीविरांच्या पेशंन योजनासाठी एक रुपयांची तरतूदही केली नाही.

 

शेतकऱ्यांनी एमएमपीच्या कायदेशीर हमीची मागणी केली आहे. मात्र, त्याचा कोणताही उल्लेख या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही,

 

इतकं काय तर शेतकरी जेव्हा मला भेटालया संसदेत आले, तेव्हा त्यांना आत देखील येऊ दिले नाही, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

भाजपा ज्यापद्धतीने चक्रव्यूह तयार करत आहेत, त्यामुळे देशाचं मोठं नुकसान होत आहे. देशांतील कोट्यवधी लोकांना याचा त्रास होतो आहे.

 

त्यामुळेच आम्हाला हे चक्रव्यूह तोडायचं असून आम्ही त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *