हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात

Winter session from 7th December in Nagpur ​

 

 

 

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरु होणार आहे.कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

 

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. सात डिसेंबरला सुरू होणारे हे अधिवेशन

 

 

 

२० तारखेपर्यंत चालणार आहे. दरम्यान या अधिवेशनाच्या कालावधीवरून विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

विरोधीपक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्यांनी ठरवल्याप्रमाणे सात तारखेलाच अधिवेशनाची सुरूवात होत आहे.

 

 

 

एकूण वर्किंग डेज १० होत आहेत. आमची मागणी होती की, किमान तीन आठवडे अधिवेशन नागपूरला चालावं, महाराष्ट्रात अनेक मोठे प्रश्न आहेत, त्यावर चर्चा करायची होती.

 

 

 

शेतकरी संकटात आहे, बेरोजगारी, रुग्णालये इत्यांदीचे प्रश्न आहेत. राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर चर्चा करायची होती.

 

 

 

विविध प्रश्नासाठी शसकीय, अशासकीय कामकाज, विनियोजन बिल, अंतिम आठवडा आणि पुरवण्यावर चर्चेसाठी दहा दिवस अपूरा वेळ आहे.

 

 

आम्ही तीन आठवड्याचा आग्रह धरला, पण या सरकारने त्यातून पळ काढला आहे. आता १० दिवसांचंच कामकाज ठरवलं आहे. आमचा आग्रह हा १५ दिवसांसाठी होता पण सरकार याबद्दल गंभीर नाही असेही विजय वडेट्टीवर म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *