अजितदादांचा आमदार शरद पवारांच्या भेटीला;राजकीय घडामोडी तीव्र

Ajitdad's MLA Sharad Pawar's meeting; political events are intense

 

 

 

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिह शिंदे यांनी आज

 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुण्यातील मोदी मागेत बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

 

शिंदे यांनी शरद पवार यांची भेट का घेतली? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

 

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला, अनेक दिगज्जांना पराभवाचा सामना करावा लागला तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं.

 

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात इनकमिंग सुरू झालं आहे. शरद पवार छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना अजित पवार गटाचे आमदार बाबजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 

त्यापूर्वी देखील पिंपरी-चिंचवडच्या काही माजी नगरसेवकांनी तुतारी हाती घेतली. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढा विधानसभेचे

 

आमदार बबन शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिह शिंदे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे, मात्र भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.

 

दरम्यान दुसरीकडे शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटत प्रवेश केला आहे.

 

पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. हा रयत क्रांतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भानुदास शिंदे हे गेल्या 25 वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहेत

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *