झिरवाळ साहेब कुठेय? कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर अजितदादांचा मिश्कील टोला
Where is Mr. Jhirwal? Ajitdad's hard work on the question of workers

उपमुखमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जनसन्मान यात्रेला दिंडोरीतून सुरुवात झाली. काल अजित पवारांच्या उपस्थितीत दिंडोरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अजितदादांसह राष्ट्रवादीचे अनेक मंत्री दिंडोरीत दाखल झाले होते. मात्र दिंडोरीत खरी चर्चा रंगली ती अजित पवार गटाचे नेते,
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांची. अजित पवारांना दिंडोरीत काही कार्यकर्त्यांकडून नरहरी झिरवाळ साहेब कुठेय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवारांनी मिश्कील टोला लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून झिरवाळ कुटुंबीय अजित पवारांना सोडून शरद पवारांसोबत जाणार, असा चर्चा सुरु आहेत. गोकुळ झिरवाळ यांनी माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील.
संधी मिळाली तर वडिलांविरोधात निवडणुकीला सामोरे जाईल, असे वक्तव्य केले आहे. चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी अजित पवार
यांच्या जनसन्मान यात्रेकडेही पाठ फिरवल्याचे दिसून आले. तर नरहरी झिरवाळ यांनी मी अजित पवार यांच्या सोबतच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे झिरवाळ कुटुंबियांची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गुरुवारी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून जनसन्मान यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी दिंडोरीत अजित पवारांचे स्वागत होत असताना कार्यकर्ते झिरवाळ साहेब कुठे आहेत?
असा प्रश्न करत नरहरी झिरवाळ यांचा शोध घेत होते. त्यावेळी अजित पवार यांनी नरहरी झिरवाळ यांच्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
नरहरी झिरवाळ कुणाच्या गाडीत कोणाला माहित? असा मिश्कील टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. त्यानंतर मी दुसऱ्या गाडीत होतो, ते दुसरीकडे होते,
असे सांगत केली अजित पवारांनी सारवासारव केल्याचे दिसून आले. नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे.
दरम्यान, गोकुळ झिरवाळ यांनी एबीपी माझाशी बोलताना मी शरद पवार यांच्या सोबत असून आगामी निवडणुक लढण्याचे देखील त्यांनी संकेत दिले आहेत.
यामुळे आता दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ विरुद्ध गोकुळ झिरवाळ अशी लढत पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.