महायुतीत शिंदे गटाचा मराठवाड्यातील “या” जागेवर दावा

The Shinde group in the grand alliance claims this seat in Marathwada

 

 

 

 

राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीची जोरदार तयारी सुरु असून मराठवाड्यात राजकीय घटनांना वेग आला आहे. सध्या बीड मतदारसंघात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत असून

 

शिंदे गटाकडून अनिल जगताप निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे समोर येत आहे.भाजप पाठोपाठ बीडच्या जागेवर शिंदेगटानेही दावा केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीड विधानसभेची जागा महायुतीतून घेणार असल्याचं जगताप यांनी सांगितलं आहे.

लोकसभेनंतर आता विधानसभेचे वेध राजकीय पक्षांना लागले आहेत. इच्छूक उमेदवार राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या गाठीभेटी घेत असून

 

यंदा राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात पडलेल्या फूटीनंतर महायुतीने बीडच्या जागेवर दावा केला असल्याचं दिसतंय. त्यातच भाजपनंतर आता शिंदेगटाकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

 

बीड विधानसभा मतदार संघावर शरद पवार गटाचे वर्चस्व असून सध्या संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीत बीड विधानसभेची जागा ही शिवसेनेला मिळालेली आहे.

 

त्यामुळे आता याच जागेवर शिंदे गट दावा करत आहे. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीड विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे येणाऱ्या दिवसात महायुतीत बीड विधानसभा मतदार संघात जागावाटपाचे आव्हान असणार आहे.

 

 

उद्ध्व ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणारे अनिल जगताप यांनी निवडणूकीपूर्वी दरवेळी मला डावलले जाते असे म्हणत उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली होती.

 

आता बीडच्या राजकारणात विधानसभा निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेकडून लढवणार असल्याचं सांगत त्यांनी बीडच्या जागेवर दावा केल्याचं दिसतंय.

 

त्यामुळे आता महायुतीत जागावाटपाचा पेच निर्माण होणार की काय? अशी चर्चा राजकी वर्तुळात होताना दिसतेय. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर

 

मराठवाड्यात महायुतीतच या पक्षातून त्या पक्षात नेतेमंडळी उड्या मारताना दिसत असून जागावाटपाचे खेळ सुरु झाल्याचे बोलले जात आहे..

 

 

सध्या राज्यात विधानसभेचे वेध लागले असून कुठल्याही क्षणी विधानसभा जाहीर होऊ शकते. बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी

 

कार्यकर्त्यांनी चक्क स्टॅम्प पेपरवर निष्ठा व्यक्त करत नारायण डक यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजलगाव विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

 

तसेच, पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी देऊ नये अशीही मागणी या स्टॅम्प पेपरवर करण्यात आलेली आहे.

 

त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नेमकं माजलगाव विधानसभा क्षेत्रामध्ये काय निर्णय घेतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *