विजय वडेट्टीवार म्हणाले नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांचे आव्हान वाटत नाही

Vijay Wadettiwar said that there is no challenge from Ashokrao Chavan in Nanded

 

 

 

नांदेडमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते

 

आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी आम्ही संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नांदेड काँग्रेसचा गड राहिला आहे.

 

काँग्रेस हा जनाधार असलेला पक्ष आहे. काँग्रेसचा इतिहासा नेत्याचा पुरता मर्यादित नाही. दोन प्रकारचे जंगल असतात एक प्लांटेशन केलेलं आणि एक नॅचरल काँग्रेसचा नॅचरल पक्ष आहे.

 

भाजप नॅचरल नाही प्लांटिंग केलेला हा पक्ष आहे. काँग्रेस जनाधार असलेला नॅचरल पक्ष आहे. काँग्रेसचा कॅडर बेस पेक्षा हे लीडर बेस नाही, म्हणून आम्हाला पूर्णतः विजयाची खात्री नांदेड जिल्ह्यात आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

 

अशोक चव्हाण आधी काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपत आहेत. आगामी निवडणुकीत अशोक चव्हाण यांचं आव्हान समोर असणार आहे. तुमची याबाबत काय भूमिका आहे?

 

असा प्रश्व विचारण्यात आला. तेव्हा अशोकराव चव्हाण यांचे मला आव्हान वाटत नाही. काँग्रेस हा केडर बेस पक्ष आहे, लिडर बेस नाही. त्यामुळे लीडर येतात,

 

जातात… पण पक्ष मात्र नव्या जोमाने काम करतो. आपण पाहिला असेल कुणाची शक्ती काय आहे आम्हाला आव्हान नाही आम्ही एकतर्फी विजय मिळवू, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

 

मराठवाड्यात आम्ही तीन जागा लढवल्या. तीनही जागा जिंकलो 100% आमचा स्ट्राईक रेट आहे. नांदेड जिल्ह्यात आमदार शंभर टक्के स्ट्राईक रेट राहील.

 

ज्या जागा महाविकास आघाडीमध्ये मिळतील त्या सर्व जागा आम्ही जिंकू. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणूक झाल्यानंतर ठरवू अजून कोणताही चेहरा नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

 

 

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरही विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. हे भाजप पुरस्कृत मनसे आणि शिंदे हे सगळे मिळून आहे.

 

मूलभूत प्रश्नापासून बगल देण्यासाठी अशे उद्योग महाराष्ट्रात सुरू आहेत. महाराष्ट्रात उद्या दंगली होतील हे सत्ताधारी पक्ष घडवतील, महागाई बेरोजगारी आहे तरुणाचे प्रश्न आहेत उद्योग गुजरातला पळाले आहेत, असं ते म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *