विधानसभा निवडणुकीत थेट प्रत्येक कुटुंबाला २ बीएचके फ्लॅट ची घोषणा

Announcement of 2 BHK flat to every family directly in assembly elections

 

 

 

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने (पीडीपी) शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

 

यात कलम ३७० आणि ३५ए फेरस्थापनेचे प्रयत्न आणि भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक पुढाकार यांचा उल्लेख आहे. तसेच काश्मिरी पंडितांची खोऱ्यात सन्मानपूर्वक घरवापसी या मुद्द्यालाही स्थान देण्यात आले आहे.

 

 

२०१९ मध्ये कलम ३७० आणि ३५ ए च्या असंवैधानिक आणि बेकायदेशीर रद्दीकरणामुळे काश्मीरचा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा झाला आहे.

 

त्यामुळे या भागातील लोकांना जाणवणारी अलिप्तता अधिक वाढली. स्थानिकांचा आवाज ऐकून त्यांच्या हक्कांचे रक्षण केले जाईल, असे ‘पीडीपी’ने आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे.

 

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक पुढाकार, संघर्षाचे निराकरण, आत्मविश्वास निर्माण करण्याचे उपाय आणि प्रादेशिक सहकार्य

 

आणि व्यापार व सामाजिक देवाणघेवाण करण्यासाठी नियंत्रण रेखा ओलांडून संयुक्तेसाठी भर दिला जाईल. राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,

 

नागरी समाज आणि संबंधित नागरिकांच्या अन्यायकारक अटकेला आळा घालण्यासाठी ‘पीएसए’, ‘यूएपीए’ यासह ‘आफ्स्पा’ कायदा रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ‘पीडीपी’ने म्हटले आहे.

 

पीडीपीने दिलेली ठळक आश्वासने
– काश्मिरी पंडितांच्या कुटुंबांना दोन बीएचके घरे देणार
– प्रत्येक घराला दोनशे युनिटपर्यंत मोफत वीज

 

– प्रलंबित वीज बिलांसाठी एक वेळ तडजोडीची संधी
– पाण्यासाठी मीटर प्रणाली रद्द करणार

 

– आर्थिक दुर्बलांना प्रतिवर्षी बारा सिलिंडर मोफत
– वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, विधवा निवृत्तिवेतन देणार

 

– अपंगांसाठी एक ते दोन हजार रुपयांपर्यंत निवृत्तिवेतन
– ६० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वर्षात नियमित करणार

– सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *