अशोक चव्हाण समर्थक आमदाराचा राजीनामा

Supporter of Ashok Chavan MLA resigns

 

 

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला ‘अपेक्षित’ धक्का मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.

 

अंतापूरकर हे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात. चव्हाणांच्या

 

भाजप प्रवेशापासूनच अंतापूरकर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार अंतापूरकर भाजपच्या वाटेवर आहेत.

 

 

जितेश अंतापूरकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

 

निवडणुकीत काँग्रेसची काही मतं फुटली होती, छुप्या मतदानामुळे त्या आमदारांची नावं समोर आली नव्हती, परंतु अंतापूरकरांवर हायकमांडचा संशय होता.

 

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या संशयित आमदारांवर थेट कारवाई करणं कठीण असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट न देण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचं बोललं जात असे. ही गोष्ट लक्षात घेत जितेश अंतापूरकर यांनी सावध पावलं टाकल्याची चर्चा आहे.

क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय असलेल्या आमदारांपैकी पक्ष सोडणारे जितेश अंतापूरकर हे पहिलेच आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले होते.

 

मात्र २०२१ मध्ये कोव्हिड काळात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र जितेश विजयी झाले.

 

जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

 

त्यावेळी जितेश अंतापूरकरांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा अंतापूरकर यांनी केला होता.

 

काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी दोन वाजता ते भाजपचा झेंडा खाद्यावर घेणार असल्याची माहिती आहे.

 

जितेश अंतापूरकर कधीही पक्षाची साथ सोडून महायुतीत जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होतीच. त्यामुळे अंतापूरकरांनी पक्षाला दिलेला धक्का हा काहीसा अनपेक्षित मानला जातो.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *