२४ तासांत भाजपच्या २० नेत्यांचे राजीनामे
20 BJP leaders resigned within 24 hours

हरयाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं बुधवारी ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर भाजपला नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या २४ तासांत २० नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांची नाराजी पक्षाला येत्या निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता आहे.
काही नेत्यांनी कर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पक्ष सोडणाऱ्यांच्या यादीत ऊर्जा मंत्री रणजीत सिंह चौटाला, आमदार लक्ष्मण दास नापा यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
लक्ष्मण नापा- रतियाचे आमदार असलेल्या नापांनी तिकीट न मिळाल्यानं भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं रतियामधून माजी खासदार सुनीता डुग्गल यांना तिकीट दिलं आहे.
करण देव कंबोज- हरयाणा भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य अध्यक्ष आणि माजी मंत्र्यानं उमेदवारी न मिळाल्यानं पक्षाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे.
विकास उर्फ बल्ले- दादरी किसान मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षांचा भाजपमधून राजीनामा
अमित जैन- भाजप युवा राज्य कार्यकारणी सदस्य आणि सोनीपत विधानसभा निवडणुकीचं प्रभारीपद सोडलं.
शमशेर गिल- उकलाना मतदारसंघातून तिकीट न मिळाल्यानं पक्षाकडे राजीनामा पाठवला.
सुखविंदर मंडी- हरयाणा भाजप शेतकरी मोर्चाचे राज्य अध्यक्षांचा पक्षातून राजीनामा
दर्शन गिरी महाराज- हिसारमधील भाजप नेत्याचा राजीनामा
सीमा गॅबिपूर- वरिष्ठ भाजप नेत्याचा सगळ्या पदांचा राजीनामा
आदित्य चौटाला- एचएसएएम बोर्डच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. चौटालांनी २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली होती.
आशु शेरा- पानीपतमध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा. तिकीट कापण्यात आल्यानं नाराज.
सविता जिंदल- भाजपमधून राजीनामा देऊन हिसारमधून अपक्ष लढण्याची घोषणा.
तरुण जैन- हिसारमधून अपक्ष निवडणूक लढण्याची इच्छा.
नवीन गोयल- गुरुग्राम भाजपमधील पदांचा राजीनामा
डॉ. सतीश खोला- रेवाडीमधून तिकीट न मिळाल्यानं पक्षातून राजीनामा
इंदू वैलेचा- भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजीव वैलेचा यांच्या पत्नी इंदू वैलेचा यांनी पक्ष सोडला. त्यांच्या पाठोपाठ पतीचाही पक्षाला रामराम.
बचन सिंह आर्य- माजी मंत्र्यांनी भाजप सोडला.
रणजीत चौटाला- मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय.
विश्वंभर वाल्मिकी- माजी मंत्र्यांचा भाजपमधून राजीनामा.
पंडित जी. एल. शर्मा- भाजपमधून राजीनामा देऊन दुष्यंत चौटाला यांच्या निवासस्थानी पोहोचले. राज्य उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ८ सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता.
प्रशांत सनी यादव- लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रेवाडीमधून तिकीट मागितलं होतं. उमेदवारी न मिळाल्यानं राजीनामा दिला. आता अपक्ष लढण्याची शक्यता आहे.