बाबा सिद्दीकींची बातमी कळताच सलमान खान रडत-रडत रुग्णालयात आला
On hearing the news of Baba Siddiqui, Salman Khan came to the hospital crying
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा चेहरा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी राजकारणातील मातब्बर नेते असण्यासोबत बॉलिवूड सेलिब्रिटींचे खास मित्रही होते.
अभिनेता सलमान खानसोबत बाबा सिद्दीकी यांची खास मैत्री होती. सलमान आणि बाबा सिद्दीकी यांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं जायचं. भाईजानचे चांगले मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी ऐकताच भाईजानला अश्रू अनावर झाले.
सिद्दीकींच्या हत्येची बातमी ऐकताच सलमान खानने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी सलमान खानचे डोळे पाणावले होते. आपला मित्र गमावल्याच दु:ख सलमान खानच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी हे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे जवळचे मित्र होते.
सलमान खासशिवाय बाबा सिद्दीकी यांची शाहरुख खान, संजय दत्त यांच्यासह इतर अनेक बड्या स्टार्सशी मैत्री होती. एवढेच नाही तर सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील तुटलेली मैत्री जोडणारी व्यक्ती बाबा सिद्दीकी होते.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी समजताच सलमान खानने लिलावती रुग्णालयाकडेस धाव घेतली. सलमान खानने बिग बॉस 18 चं शूटही रदद् केल्याची बातमी समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर दुर्गापुजे दरम्यान गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील भांडण मिटवण्याचं राम बाबा सिद्दीकी यांनी केले होते. 2008 मध्ये एका पार्टीत सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात जोरदार भांडण झाले होते.
त्यानंतर सलमान आणि शाहरुखची घट्ट मैत्री तुटली होती. दोघांमधील नाराजी इतकी टोकाला पोहोचली होती की, दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे टाळायचे.
बाबा सिद्दीकी त्यांच्या भव्य रोजा इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध होते. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची कायम चर्चा असायची. बाबा सिद्दीकी यांनी 2013 मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते,
ज्यामध्ये त्यांनी सलमान खान आणि शाहरुख खान दोघांनाही आमंत्रित केले होते. या पार्टीत दोघेही आमनेसामने आले तेव्हा अनेक वर्षांच्या भांडणानंतर सलमान
आणि शाहरुख खान यांनी बाबा सिद्दीकीसमोर एकमेकांना मिठी मारली. यानंतर दोघेही सर्व नाराजी विसरून पुन्हा मित्र बनले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेवर शरद पवार यांनी खेद व्यक्त केला असून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. बाबा सिद्दिकी यांची हत्या म्हणजे सर्वसामान्यांसाठी धोक्याची घंटा असून याची चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारावी आणि सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे.
गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ
एक सत्तेत असलेल्या नेत्याला अशा प्रकारे भररस्त्यात गोळ्या घातल्या जातात हे धक्कादायक असून कायदा आणि सुव्यस्था ढासळल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
अजित पवार गटाच्या दोन नेत्यांची एकाच आठवड्यात हत्या करण्यात आली, गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
दरम्यान या हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
ज्येष्ठ नेते, बाबा सिद्दिकी यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. सत्ताधारी नेते जर महाराष्ट्रात सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल, याचा विचार करा.
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांच्यावर शनिवारी संध्याकाळी मुंबईतील वांद्रे पूर्वमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
या घटनेनंतर सर्व स्तरातून धक्का व्यक्त करण्यात येत आहे. मनोरंजनसृष्टीतही अनेकांशी घनिष्ठ संबंधांसाठी ओळखले जाणारे बाबा सिद्दकी यांच्या हत्येवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केलाय.
अभिनेता सलमान खान, संजय दत्त यांनी या घटनेची माहिती कळताच मुंबईच्या कलावती रुग्णालयात हजेरी लावल्याचंही दिसलं. अनेक बॉलिवूड कलाकारांना या घटनेनं धक्का बसलाय. सोशल मिडियावर अनेकांनी बाबा सिद्दक्कींना श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, शिल्पा शेट्टी तसेच प्रिया दत्त, वीर पहारिया, राज कुंद्रा यांच्यासह अनेकजणांनी आपल्या सोशलमिडियावरूनही शोक व धक्का व्यक्त केलाय.
अभिनेता रितेश देशमुख यांनं बाबा सिद्दकी यांच्या हत्येनंतर x माध्यमावर एक श्रद्धांजलीची पोस्ट शेअर केली आहे. त्यानी त्यांच्या जाण्यानं मोठा धक्का बसला असल्याचं सांगत त्यांच्या कुटुंबाला धीर दिलाय.
माजी लोकसभा सदस्य आणि अभिनेता संजय दत्त यांची बहिण प्रिया दत्तनेही सोशल मिडियावर आपलं दु:ख शेअर केलंय. आज बाबा सिद्दकी यांच्या हत्येच्या बातमीनं मी हादरले आहे.
बाबा राजकीय सहकारी होते असं तिनं म्हटलंय. x माध्यमावर तिनं ही पोस्ट शेअर केली आहे. माझ्या वडिलांसाठी, बाबा सिद्दीक हे मुलासारखे होते आणि माझ्यासाठी ते एक भाऊ आणि प्रिय मित्र होते.
माझ्या वडिलांच्या राजकीय प्रवासात आणि त्यानंतरही ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी मला त्यातील चढ-उतारांवर मार्गदर्शन केले आणि त्यांचा अतूट पाठिंबा दिला.
त्याचे नुकसान कुटुंबातील सदस्याच्या जाण्यासारखे वाटते. भाभी, झीशान आणि अर्शियासाठी माझ्या हृदयात रक्तस्त्राव होतो. ईश्वर त्यांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. असंही तिनं पुढे लिहिलंय.
बाबा सिद्दकी यांच्या हत्येची बातमी कळताच अनेक बॉलिवूड कलाकार कलावती रुग्णालयात शनिवारी रात्री दाखल झाले होते.
अभिनेता संजय दत्त, सलमान खान तसेच शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा हे दोघेही सिद्दकी यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी रुग्णालयात गेल्याचे दिसून आले.
झहीर इक्बालचे वडील इक्बाल रतनसी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची बहीण प्रिया दत्तही ही बातमी मिळताच तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला.
याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एक जण अद्याप फरार असून त्याची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. त्यांच्या कार्यालयापुढे येऊन पोलीस संरक्षण असताना गोळी झाडली जात असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर जर अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
सध्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, कोण सुरक्षित आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ आहे.
सत्ताधाऱ्यांनी फलक लावून लोकांना सांगायला पाहिजे की, आपली सुरक्षा आपण करा, असे असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. सत्ताधारी योजना व सत्ता मिळवण्यात व्यस्त आहे.
त्यामुळे पोलिसांचे इंटेलिजन्स काम करत नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले नाही तर गुंडांचे राज्य आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्याची शक्ती मिळेल, अशी प्रार्थना करतो, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी करनैल सिंह हा हरियाणाचा तर धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे.
हे तिन्ही हल्लेखोर रिक्षानं घटनास्थळी आल्याची माहिती असून या प्रकरणात चौथा व्यक्ती या तिघांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास बिश्नोई गँगप्रमाणेच एसआरए वादाच्याही अँगलने होणार असल्याची माहिती आहे.