ई़डीच्या मोठ्या अधिकाऱ्याला २० लाखांची लाच घेताना अटक

Senior ED officer arrested for accepting bribe of 20 lakhs

 

 

 

 

तामिळनाडू पोलिसांनी ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाच अटक केली आहे. अंकित तिवारी असं या अधिकाऱ्याच नाव असून दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाच्या (डीव्हीएसी) मुदुराई शाखेने ही कारवाई केली आहे.

 

 

 

शुक्रवारी दिंडीगूल- मदुराई महामार्गावरून पोलिसांनी त्याला त्याब्यात घेतले. राज्य सरकारच्या संस्थेने केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली महिना भरातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली होती.

 

 

 

अंकित तिवारीने यापूर्वी गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये सेवा बजावली आहे. दरम्यान शुक्रवारी दिंडीगुलमधील एका व्यक्तीकडून २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना तामिळनाडून पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

 

 

ज्या व्यक्तीने तिवारीची पोलिसांकडे तक्रार केली त्याने २० देण्याचे मान्य केल्यानंतर डीव्हीएसी च्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. त्यानंतर या अधिकाऱ्याला पकडण्यात पोलिसांना सहकार्य केलं होतं.

 

 

 

केंद्र सरकारची संस्था असलेली ईडी तामिळनाडूतील मंत्री आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करत होते. याच दरम्यान तामिळनाडूच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

 

 

प्रलंबित असलेल्या एका प्रकरणात अंकित तिवारीने संबंधित व्यक्तीला आश्वासन दिले होते. त्याबदल्यात २० लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली.

 

 

दिल्ली आणि राजस्थानमध्ये हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये ईडीचे अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये अडकत असतात. त्या तुलनेत दक्षिण भारतात घडलेली ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *