विधानसभा निवडणुकीवरून भाजपमध्ये धाकधूक ,आता नवी रणनीती

Intimidation in the BJP over the assembly elections, now a new strategy

 

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीकडून जागावाटपाच्या चर्चा आणि बैठका होत आहेत. यात कुणाला किती जागा? जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? यावर चर्चा होतेय.

 

दरम्यान, भाजपकडून विधानसभेसाठी जागांची कॅटेगरी केली आहे. त्यानुसार जिंकण्याची खात्री असलेल्या जागा, जिंकलेल्या पण अजून काम करावं लागेल अशा जागांची यादी तयारी केली आहे.

 

भाजपला ८५ जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर विद्यमान आमदार असलेल्या २५ जागांवर अधिक मेहनत करावी लागेल असा सूर पक्षाच्या बैठकीत व्यक्त केला जातोय.

 

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पक्षाकडून यासंदर्भात रणनीती आखण्यात आल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्यानं दिली आहे.

 

भाजपने २०१९ मध्ये १०५ जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती. पक्षाला २०१४ च्या तुलनेत २०१९ ला फटका बसला होता.

 

भाजपच्या १७ जागा कमी झाल्या होत्या. दोन निवडणुकांमधला अनुभव आणि सध्याची राजकीय समीकरणं यानंतर भाजपने ए, बी, सी

 

अशा तीन कॅटेगरी केल्या आहेत. (A – जिंकण्याचा विश्वास असलेल्या जागा, B – अधिक मेहनत कराव्या लागणाऱ्या जागा, C – जिंकलेल्या पण धोक्याच्या जागा)

 

भाजपने जागावाटपासंदर्भात महायुतीच्या पक्षांसोबत चर्चा करण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत पक्षाबाबत निर्णय घेतले आहेत.

 

२०१४, २०१९ ची विधानसभा निवडणूक, २०१४ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुका यामध्ये भाजपला मिळालेलं मतदान आणि आता किती मतदान मिळेल याच्या अंदाजावरून तीन कॅटेगरी निश्चित केल्या आहेत.

 

 

भाजपने २०१९ मध्ये १०५ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी आता २५ जागा अशा आहेत जिथं अधिक लक्ष केंद्रीत करावं लागेल. त्या जागा जिंकण्यासाठी भाजपला अजून मेहनत घेण्याची गरज असल्याचं पक्ष संघटनेतील वरिष्ठांचं मत आहे.

 

तर ८५ जागा जिंकू असा विश्वास पक्षाला आहे. यामध्ये गेल्यावेळी जिंकलेल्या सर्व जागा आहेत असं नाही. काही जागा धोक्यात आहेत. तर गेल्यावेळी हरलेल्या पाच ते सात जागा जिंकून येण्याचा विश्वासही पक्षसंघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

विधानसभेला राज्यात १२५ जागा जिंकण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे. महायुतीत भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता असून त्यात १२५ जागा जिंकण्याचं ध्येय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे आहेत. त्यांनी महाराष्ट्रात जबाबदारी दिलेल्या चार बड्या नेत्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा झाली असं समजते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *