आरक्षणाचा मुद्दा पेटला;काँग्रेस आमदाराचा राजीनाम्याचा इशारा

Reservation issue ignited; Congress MLA's resignation warning

 

 

 

राज्यात विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.

 

एकीकडे महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.

 

मात्र, असे असतानाच राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं उपोषणही सुरु आहे.

 

यातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. मात्र, धनगर समजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी विरोध केला आहे.

 

एवढंच नाही तर त्यांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मी लगेच राजीनामा देणार असल्याचं हिरामण खोसकर यांनी म्हटलं आहे.

 

“धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. त्याबाबत आमची भूमिका अशी आहे की, यासंदर्भात नरहरी झिरवळ यांच्या घरी आमची दोन तास बैठक झाली.

 

आमचं एकच म्हणणं आहे की, आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे. त्या आमच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ नये.

 

धनगर समाजाला वेगळं आरक्षण द्यावं. त्यासाठी आम्ही विरोध करणार नाही. मात्र, आज परिस्थिती अशी आहे, आई-वडिलांनी मुलांना मोलमजुरी करून शिकवलं

 

, पण आज त्या मुलांना नोकरी मिळत नाही. अनेक मुले बिगारी काम करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत धनगर समाजाला

 

एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर आमच्या मुलांना मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही”, असं हिरामण खोसकर यांनी म्हटलं आहे.

 

 

“आमचा धनगर समाजाला आरक्षण देण्यास काहीही विरोध नाही. मात्र, सरकारने धनगर समाजाला वेगळं आरक्षण द्यावं. असं केलं तर त्यांचंही नुकसान नाही आणि आमचंही नाही.

 

 

आता आम्ही बैठक घेत आहोत. आमची पुढची दिशा ठरवणार आहोत. त्यामध्ये पिचड, गावीत, नरहरी झिरवळ यांच्यासह आमचे जे जेष्ठ नेते आहेत पुढची दिशा ठरवणार आहेत.

 

मात्र, जो आमदार बैठकीला येणार नाही. त्या आमदाराला संघटना, समाज माफ करणार नाही. कोणी सत्तेत आहे, म्हणून बैठकीला आलं नाही

 

आणि सत्तेच्या आडवं कोणी लपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला समाज आणि संघटना मतदारसंघात फिरकू देखील देणार नाहीत”, असा इशाराही हिरामण खोसकर यांनी दिला.

 

“आम्हाला जे काही आरक्षण मिळालेलं आहे, त्यामधून धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये. धनगर समाजाला वेगळं आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही.

 

सरकारने त्यांना २ टक्के द्यायचं की ३ टक्के द्यायचं त्यासाठी आमचं काहीही म्हणणं नाही. मात्र, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मी तर लगेच राजीनामा देणार आहे.

 

मग जे आमदार राजीनामा देणार नाहीत, त्यांना समाज काय करायचं पाहून घेईल. समाजाचे जे काही २४ आमदार आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की,

 

 

सर्व आमदारांनी सोमवारी बैठकीला उपस्थित राहावं. आमच्या वरिष्ठाच्या चर्चांबरोबर जो काही निर्णय होईल, तो त्यांनी मान्य करावा, ही आमची विनंती आहे”, असा इशारा हिरामण खोसकर यांनी दिला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *